सद्‌ग्रंथांचे ‍सार

आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमेबरोबर व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कृष्णाचे अंशावतार म्हणून कृष्णद्वैपायन, वेदांची पुनर्रचना करणारे म्हणून वेदव्यास, बदरिकाश्रमात तप करणारे व तेथील व्यासगुंफेत महाभारत ग्रंथाची रचना करणारे म्हणून बादरायण व्यास, यमुनेच्या द्वीपात जन्म म्हणून द्वैपायन, पराशर ऋषींचे पुत्र म्हणून पाराशर्य असे हे वैवस्वत मन्वन्तरातील २८वे व्यास.

चार वेद
-----------------
वेदवाङ्मयाचे ४ विभाग आहेत -
१) संहिता - यात देवांची स्तुति, प्रार्थना व वर्णने आहेत. हा छंदोबध्द मंत्रांचा समूह आहे
२) ब्राह्मण - यात संहितेतील मंत्रांचा अर्थ विशद केला आहे. हे गद्य ग्रंथ आहेत. यात विविध यज्ञप्रकार व त्यांची कृति दिलेली आहे.
३) आरण्यके - यात ब्रह्माचे मनन व निदिध्यासन आहे.

१० उपनिषदे
(संदर्भग्रंथ -उपनिषदांचा अभ्यास - श्री. के.वि.बेलसरे, त्रिदल प्रकाशन)
उपनिषदे - याला वेदांत म्हणतात. हे वेदांचे उत्तमांग आहे. यात विश्वरचनेचे चिंतन, ब्रह्मस्वरूपाचे संकल्पन, आत्मदर्शनाची साधना यांचा विकास व अर्थविस्तार आहे.

१८ पुराणे
श्रीवेदव्यास यांनी आख्याने, उपाख्याने, गाथा, कल्पनिर्णय ह्यांवरून पुराणसंहिता केली.
--------------------
[संदर्भ - श्रीदेवीभागवत पृ.२९]
मुख्य पुराणे -
१) ब्रह्मवैवर्तपुराण - १८००० श्लोकसंख्या
२) पद्मपुराण - ५५००० श्लोकसंख्या

श्रीयोगवाशिष्ठ

--------------
संदर्भ - श्रीयोगवासिष्ठ - संपादक - डॉ. म.वि.गोखले. यशवंत प्रकाशन
-----------
या ग्रंथाची पर्यायी नावे
- आर्षरामायण
- उत्तररामायण
- वासिष्ठमहारामायण
- मोक्षोपायसंहिता
- बृहद्योगवासिष्ठ

प्रस्तावना
भारतीय लोकांनी श्रीरामकथेचा आश्रय करूनच वैयक्तिक आणि सामाजिक संकटांतून मार्ग काढलेला दिसतो.
श्रीमत्‌अध्यात्मरामायण ही मूळ वाल्मिकीरामायणाची अत्यंत सरस, संक्षिप्त आवृत्ती म्हणता येईल.
दैवी आणि मानवी अशा दोन्ही अंगांनी श्रीरामाचे चरित्र सांगितले आहे (वाल्मिकी रामायण).

श्रीमद्भगवद्गीता

---------------
श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास करुन मला काय मिळाले-समजले?
---------------
१. मानवदेहात येऊन परमात्मा मुमुक्षूंना स्वतःविषयी सांगतोय -
• मी कोण आहे? मी कसा आहे?
• माझ्या अनंत शक्ती कशा आहेत? त्याद्वारा मी काय करतो?
• माझ्या मायेद्वारा मी सृष्टीची उत्पत्ती- वृध्दी व लय कसा करतो?

सद्गुरुचे महत्व: (संदर्भ - श्रीगुरुगीता)
सार्थ श्रीगुरुगीता
संपादक आणि अनुवादक - गुरुभक्तीपरायण रामचंद्र कृष्ण कामत
कॄष्णभक्त दिवाकर अनंत घैसास
प्रकाशक - केशव भिकाजी ढवळे, मुंबई ४.
---------------------------
(ही गुरुगीता श्रीशिवशंकरांनी आपली प्रिय पत्नी आदिमाया जगदंबा पार्वती हिला

श्रीभावार्थ रामायण
कवी - श्रीएकनाथमहाराज
-------------
महाराजांनी मला अनुग्रह देण्यापूर्वीच मी या ग्रंथाचे वाचन सुरु केले होते. माझे उपास्यदैवत प्रभू रामचंद्र यांच्याविषयी ज्यांनी ज्यांनी ग्रंथ लिहिले ते वाचण्याचा छंद मला लागला होता. हा प्रचंड ग्रंथ वाचायला मला १ वर्ष ६ महिने लागले.
यामध्ये भाषेतील सर्व रस मला भरभरून आढळले. नाथांची विनयी, नम्र, मर्यादशील भावशैली मला अतिशय भावली.
या ग्रंथातील काही ठळक मला आवडलेले नाथांचे निरुपण देत आहे.

श्रीआत्माराम

संदर्भ - श्रीसमर्थकृत आत्माराम
विवरण -प्रा. के.वि.बेलसरे.
प्रकाशक - श्रीसमर्थ मंडळ, सज्जनगड

अवतार - अव+तृ
अव - खाली
तृ - तारणे
खाली (पृथ्वीवर) येऊन तारणे/रक्षण करणे

या अनंत कालावधीत भगवंताचे अनंत अवतार कैकवेळा होऊन गेले व अजून होणार आहेत.