परमात्मा

मी एक साधनी:
परमात्मा या त्रिगुणी मायेपेक्षा वेगळा कसा असतो? त्याला जाणणं सामान्य माणसाला एवढं कठीण का असतं?
माझ्या मनातील सद्गुरु:
परमात्मा या तीन गुणांच्या अलिकडे अव्यय असा आहे.
त्य़ामुळे त्याला कोणी जाणू शकत नाही.
परमात्मा मनुष्यरूप आणि त्यामुळे माणसांसारखाच आहे असं मूढ मानतात. प्रत्यक्षात परमात्मा सर्वश्रेष्ट, अव्यय, परम व अव्यक्त असा आहे.
परमात्मा त्याच्याच योगमायेने झाकलेला आहे. म्हणून कोणी त्याला पाहू/जाणू शकत नाही.
तो अज व अव्यय असूनही माणसं त्याला जन्म-मृत्यू असणारा समजतात.

मी एक साधनी:
परमात्मा देहरुपात कर्मे का करतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
याचे उत्तर भगवंत असे सांगतात की, तीनही लोकांत मला कोणतेही कर्तव्य नाही, मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरीही मी कर्मे करीत असतो.
जर का मी सावध (अतन्द्रित) राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल. कारण माणसे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात.
म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन.
------------------------------------------
मी एक साधनी:

मी एक साधनी:
त्रिगुणात्मक जगाचा निर्माता आणि त्याने निर्माण केलेले विश्व यांचे नाते कसे असते?

माझ्या मनातील सद्गुरु:
परमात्म्या स्वतःचे वर्णन सांगतोय की सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण मीच आहे, चराचरात असे एकही भूत नाही जे माझ्याशिवाय असेल.
माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही.
जी वस्तू विभूतियुक्त, श्रीयुक्त, शक्तियुक्त आहे ती माझ्या तेजाच्या अंशाची अभिव्यक्ति आहे.
हे संपूर्ण जग फक्त एका अंशाने धारण करुन मी स्थित आहे.
------------------------
जगाची निर्मिती ज्या परब्रह्माने केली, ते परब्रह्म असे आहे-
ते सर्व भूतांच्या आंत व बाहेर आहे,

मी एक साधनी:
दिव्य चक्षु भगवंताने अर्जुनाला प्रदान केल्यानंतर त्याला जाणवलेला परमात्मा कसा होता?

माझ्या मनातील सद्गुरु:
अर्जुनाला असं जाणवलं की परमात्मा हा परम ब्रह्म आहे.
तो परम धाम आहे.
तो परम पवित्र आहे.
ऋषीगण त्याला सनातन, दिव्यपुरुष, आदिदेव, अज, विभु मानतात.
तो भूतांना उत्पन्न करणारा आहे.
तो भूतांचा ईश्वर आहे.
तो जगाचा स्वामी आहे.
तो पुरुषोत्तम आहे.
तोच त्याला जाणतो.
तो त्याच्या दिव्य विभूतींच्या द्वारा लोकांना व्यापून राहिला आहे.
तो अक्षय काल आहे.
तो विश्वतोमुख आहे.
तो सर्वांना धारण करणारा आहे.

मी एक साधनी:
अकराव्या अध्यायात अर्जुनानं परमेश्वराचं महाकालरूप(विश्वरुप), ऐश्वर्यसंपन्न, अविनाशी असे रूप पहाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयी मला आपल्याकडून जाणून घ्य़ायचे आहे.

माझ्या मनातील सद्गुरु:
अर्जुनाची इच्छा ऐकल्यानंतर भगवंत त्याला म्हणाले की, पार्था शेकडो प्रकारची, रंगाची, आकारांची माझी दिव्यरूपे पहा.
यात १२ आदित्य,
८ वसू,
११ रूद्र,
२ अश्विनीकुमार,
४९ मरुतगण असतील.
चराचरासह संपूर्ण जग एकत्रित असेल.
तुझे लौकिक नेत्र हे माझे रूप पहाण्यास असमर्थ आहेत.
दिव्य चक्षुच ही ईश्वरीय योगशक्ती पाहू शकतात.

मी एक साधनी:
महाराज, या जगाचा निर्माता कसा आहे?

माझ्या मनातील सद्गुरु:
परमात्मा जाणण्यास योग्य आहे, परमात्म्याला जाणल्यावर मनुष्य परमानंद प्राप्त करुन घेतो.
परमात्मा अनादी आहे,
हे परब्रह्म सत्‌ ही नाही आणि असत्‌ही नाही.
हे परब्रह्म सर्व बाजूंनी हातपाय असणारे आहे,
ते सर्व बाजूंना डोळे असणारे आहे,
ते सर्व बाजूंना मुखे असणारे आहे,
ते सर्व बाजूंना कान असणारे आहे,
हे परब्रह्म सर्वांना व्यापून राहिले आहे.
परब्रह्म सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे,
ते सर्व इंद्रियांनी रहित आहे,
ते आसक्तीरहित आहे,

परमात्मा / परब्रह्म
---------------------------------
या विषयाअंतर्गत एकूण ९ प्रकारे परमात्म्याने स्वतःचे वर्णन केलेले आणि अर्जुनाने ऐकलेले व जाणलेले मला आढळले -

  • परमात्मा कसा आहे? (अध्याय ५, ७, १०, ११)
  • क्षेत्रज्ञ परमात्म्याचे वर्णन (अध्याय १३)
  • पुरुषोत्तम परमात्म्याचे वर्णन (अध्याय १५)
  • परमात्मा कोण आहे? (अध्याय़ ९)
  • परमात्म्याच्या प्रमुख विभूती (अध्याय १०)
  • परमात्म्याचे महाकालरूप (विश्वरूप) (अध्याय १०)
  • विश्वरूपदर्शनानंतर परमात्मा काय म्हणाला? (अध्याय १०)

परमात्मा:
परमात्म्याला जाणल्यावर मनुष्य परमानंद प्राप्त करुन घेतो.

परमात्मा कसा आहे?

  • परमात्मा अनादी आहे,
  • हे परब्रह्म सत्‌ ही नाही आणि असत्‌ही नाही.
  • हे परब्रह्म सर्व बाजूंनी हातपाय असणारे आहे,
Syndicate content