pravachane

या महिन्यातील ३१ प्रवचने आनंद व समाधान या विषयावरची संकलित करून मूळ ग्रंथात दिलेली आहेत. ऋजुता विनोदांनी त्यातील चिंतन-मनन-साधनेसाठी लागणारे नेमके सार येथे दिलेले आहे.

साधकांना, जिज्ञासूंना व मुमूक्षूंना दैनंदिन प्रापंचिक व पारमार्थिक अडचणींवर हमखास उपाय मिळावा या करीता श्री. गो.सी.गोखले यांनी महाराजांच्या निरुपणातील मुद्दे संकलित करून एक पुस्तक १९६६ या वर्षी प्रसिध्द केले.

त्याच्या कैक आवृत्या निघाल्या.

माझ्या नित्य वाचनात ही प्रवचने २००६ पासून आहेत.

मन निःशंक करून नामस्मरणाची गोडी लावण्याचं काम या प्रवचनांनी केलंय.

रोजचं प्रवचन वाचताना महाराज मला काही वेगळंच सांगत आहेत असं मला वाटतं!

प्रत्येक प्रवचनांतील मला भावलेलं नेमकं सार इथे द्यावं असं मला वाटलं...

Syndicate content