विश्वरूप

मी एक साधनी:
या अध्यायात त्यावेळी होणार्‍या धर्मयुध्दाशी निगडित वर्णन आलेले आहे, ते कसे आहे?

माझ्या मनातील सद्गुरु:
संजयाने असे वर्णन केले की,
कौरवांकडचे योध्दे विश्वरुपाच्या त्या विकराल मुखात पळत प्रवेश करीत आहेत. काहीजण चूर्ण झालेल्या मस्तकांसह या विश्वरूपाच्या दातांच्यामध्ये चिकटलेले दिसत आहेत.
श्रेष्ठ असे ते वीर धडाडून पेटलेल्या काळाच्या मुखात शिरत आहेत.
हे रूप त्या सर्वांचा घास करून सर्व बाजूंनी चाटत गिळत आहे.

॥श्रीराम समर्थ॥

मी एक साधनी:
परमात्म्याच्या कालस्वरुप अशा विश्वरुपात समाविष्ट देवतांचे वर्णन गीतेत कसे केलेले आहे?

माझ्या मनातील सद्गुरु:
अर्जुनाने असे पाहिले की या विश्वरूपामध्ये सर्व देव सामावलेले आहेत.
अनेक भूतांचे समुदाय आहेत.
कमळाच्या आसनावर विराजित ब्रह्मदेव आहेत,
श्री शंकर आहेत,
सर्व ऋषी आहेत,
दिव्य सर्प आहेत.
देवतांचे समूह या रूपात प्रवेश करताना दिसत आहेत.
ते हात जोडून भयभीत होऊन गुणगान करीत आहेत.
महर्षि व सिध्द यांचे संघ स्तोत्रांच्या द्वारा स्तुति करीत आहेत आणि कल्याणपर बोलत आहेत.
११ रूद्र,
१२ आदित्य,
८ वसू,
२ अश्विनीकुमार,

मी एक साधनी:
संजयाने विश्वरूपाचे जे वर्णन केले ते कसे आहे?

माझ्या मनातील सद्गुरु:
अनेक मुखे असलेले,
अनेक नेत्र असलेले,
अनेक अद्भूत दर्शने देणारे,
खूप दिव्य भूषणं व आभरणं घातलेले,
खूप दिव्य आयुधे हाती घेतलेले,
दिव्य माला व वस्त्र धारण केलेले,
संपूर्ण शरीरावर दिव्य गंधाचा लेप असलेले,
सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त असे,
सर्व बाजूंना मुखे असलेले,
वर्णन न करता येण्याइतका प्रचंड प्रकाश फाकलेले,
अनेक प्रकारांनी विभागलेले संपूर्ण जग परमेश्वराच्या शरीरात एका जागी स्थित असलेले असे ते अनंत असे रूप होते.

॥श्रीराम समर्थ॥

मी एक साधनी:
अकराव्या अध्यायात अर्जुनानं परमेश्वराचं महाकालरूप(विश्वरुप), ऐश्वर्यसंपन्न, अविनाशी असे रूप पहाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयी मला आपल्याकडून जाणून घ्य़ायचे आहे.

माझ्या मनातील सद्गुरु:
अर्जुनाची इच्छा ऐकल्यानंतर भगवंत त्याला म्हणाले की, पार्था शेकडो प्रकारची, रंगाची, आकारांची माझी दिव्यरूपे पहा.
यात १२ आदित्य,
८ वसू,
११ रूद्र,
२ अश्विनीकुमार,
४९ मरुतगण असतील.
चराचरासह संपूर्ण जग एकत्रित असेल.
तुझे लौकिक नेत्र हे माझे रूप पहाण्यास असमर्थ आहेत.
दिव्य चक्षुच ही ईश्वरीय योगशक्ती पाहू शकतात.

Syndicate content