भगवंत

मी एक साधनी:
महाराज, या जगाचा निर्माता कसा आहे?

माझ्या मनातील सद्गुरु:
परमात्मा जाणण्यास योग्य आहे, परमात्म्याला जाणल्यावर मनुष्य परमानंद प्राप्त करुन घेतो.
परमात्मा अनादी आहे,
हे परब्रह्म सत्‌ ही नाही आणि असत्‌ही नाही.
हे परब्रह्म सर्व बाजूंनी हातपाय असणारे आहे,
ते सर्व बाजूंना डोळे असणारे आहे,
ते सर्व बाजूंना मुखे असणारे आहे,
ते सर्व बाजूंना कान असणारे आहे,
हे परब्रह्म सर्वांना व्यापून राहिले आहे.
परब्रह्म सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे,
ते सर्व इंद्रियांनी रहित आहे,
ते आसक्तीरहित आहे,

परमात्मा / परब्रह्म
---------------------------------
या विषयाअंतर्गत एकूण ९ प्रकारे परमात्म्याने स्वतःचे वर्णन केलेले आणि अर्जुनाने ऐकलेले व जाणलेले मला आढळले -

  • परमात्मा कसा आहे? (अध्याय ५, ७, १०, ११)
  • क्षेत्रज्ञ परमात्म्याचे वर्णन (अध्याय १३)
  • पुरुषोत्तम परमात्म्याचे वर्णन (अध्याय १५)
  • परमात्मा कोण आहे? (अध्याय़ ९)
  • परमात्म्याच्या प्रमुख विभूती (अध्याय १०)
  • परमात्म्याचे महाकालरूप (विश्वरूप) (अध्याय १०)
  • विश्वरूपदर्शनानंतर परमात्मा काय म्हणाला? (अध्याय १०)

नोव्हेंबर महिन्यातील प्रवचने - मूळ ग्रंथामध्ये याही महिन्यात "भगवंत" या विषयावर प्रवचने संग्रहित केलेली आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

ऑक्टोबर महिन्यातील प्रवचने - मूळ ग्रंथामध्ये या महिन्यात ‘भगवंत’ या विषयावर ३१ प्रवचने दिली आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

Syndicate content