सगुण उपासना

- परमात्मा निर्गुण-निराकार-नामातीत-रुपातीत-गुणातीत-अनादि-अनंत आहे.
- तो कोठेही जात नाही आणि येत नाही.
- सर्व विश्वाचा कर्ता-त्राता आणि संहारक तोच आहे.
- आपलेच असंख्य अंश निर्माण करुन आपल्याच योगमायेने तो खेळ खेळतो.
- परब्रह्माशी एकरुप होईपर्यंत साधकाने सगुण उपासना करावी.
- या उपासनेतून माणूस परमात्म्याशी संधान ठेवायचा प्रयत्न करतो.
- तो त्याच्या कुलदैवतांची आणि सद्गुरु जे सांगतील त्या उपास्यदैवताची निवड करुन त्याला आपल्यासारखाच मनुष्य समजून त्याच्यावर विविध प्रकारे प्रेम करण्याचा प्रयत्न करतो.
- काही विदेही व जीवन्मुक्त सत्पुरुष सुध्दा लोकसंग्रहाकरीता सगुण उपासना चालू ठेवतात.

Syndicate content