पुण्यकर्म करणारा

 

कोणाला चांगली गती मिळते
पुत्र असणार्‍या धर्मात्म्याला कधीही दुर्गती मिळत नाही
धर्मात्म्याने पुत्रप्राप्तीसाठी (पूं’ नामक नरकापासून तारणारा/वाचवणारा पुत्र) काय करावे?
हरिवंशाची कथा ऐकून
भक्तीपूर्वक शतचंडी यज्ञ करून
तसेच शिवाची आराधना करणार्‍या श्रेष्ठ बुद्धी असलेल्या पुरुषाने पुत्राला उत्पन्न करावे
ब्राह्मविवाहाद्वारा विवाहित असलेल्या पत्नीच्या ठिकाणी जो पुत्र निर्माण होतो तो ब्रह्मोढा - ब्रह्मकर्म करणारा
पुत्र आपल्या पितरांना चांगली गती देतो
विवाह न करता पुत्र उत्पन्न केल्यास तो पितरांना नरकात पोचवतो कारण ब्रह्मकर्माचा त्याला अधिकार नाही
सवर्ण स्त्रियांच्या ठिकाणी सवर्ण पतींपासून जे औरस पुत्र निर्माण होतात ते श्राद्धाच्या वेळी दिलेल्या दानांमुळे आपल्या पितरांना चांगली गती देऊ शकतात
दुसरे कोणीही श्राद्ध करून चांगली गती देऊ शकतात
जर कुलनाश झाला किंवा काही कारणाने पितरांसाठी श्राद्ध केले गेले नाही तर ते प्रेतयोनीतच राहातात अशांसाठी जर नारायणविधी केला तर त्यातील मंत्रांमुळे प्रेतयोनीतून त्यांची मुक्ती होऊ शकते
उत्तम शास्त्रांचे श्रवण करणे भगवान विष्णूंची पूजा संतांचा सहवास यामुळे प्रेतयोनीतून मुक्ती मिळू शकते
कलश, जल, दूध, तूप इ दानामुळे सर्व अशुभांचा नाश होतो. दुर्गती नष्ट होते चांगली गती हवी असेल तर मृत्यूविषयी समजून घेऊन निरलस होऊन मनुष्याने ज्ञात-अज्ञात पापांचे प्रायश्चित्त करावे
(संदर्भ - गरूडपुराण)

॥श्रीराम समर्थ॥