श्रीभक्तविजयमधील महत्वाचे संदर्भ

संदर्भग्रंथ -

कै. महिपतीबुवा ताहराबादकर रचित ॥श्रीभक्तविजय॥
संपादक - श्री. शं.रा.देवळे.
----------------------------------
श्रीमहिपतीबुवा (जन्म - १७१५, मृत्यू - १७९०)
मूळ स्थान - अहमदनगर जि. राहुरी तालुका, ताहराबाद गाव.
- दादोपंत व गंगाबाई या शुचिर्भूत विठ्ठ्लभक्त दांपत्याला साठीनंतर झालेले प्रसाद अपत्य.
- सद्‌गुरू - श्रीतुकाराममहाराज
- कार्य - संतांच्या उपलब्ध चरित्रांचे संकलन करून ओवीबद्ध ग्रंथ लेखन.
---------------------
त्यांचे संदर्भग्रंथ -

१) उत्तरेला होऊन गेलेले "नाभाजी" हे ब्रह्मदेवाचे अवतार. त्यांनी ग्वालेरी भाषेत चरित्रे लिहीली होती.
२) माणदेशात होऊन गेलेले उध्दव चिद्घन
-------------------------------------
विविध भक्त हे भगवान विष्णूच्या आदेशाने खालील अवतार घेते झाले..(संदर्भ - व्यासमहर्षीरचित भविष्योत्तर पुराण)

  • स्वतः श्रीविष्णू - श्रीज्ञानेश्वरमहाराज
  • श्रीशंकर - श्रीनरसी मेहता
  • श्रीब्रह्मदेव - श्रीसोपानमहाराज
  • श्रीसदाशिव - श्रीनिवृत्तीमहाराज
  • आदिमाया - श्रीमुक्ताबाई
  • श्रीवाल्मिकी ऋषी - श्रीतुलसीदास
  • व्यासमुनी - श्रीजयदेव
  • उध्दव - श्रीनामदेवमहाराज
  • शुकमुनी - श्रीसंतकबीर
  • दारूक - श्रीरामदास

अवतारकार्याची दिशा -
- नीच जातीत जन्म घ्यावेत.
- कलियुगात भगवंताचे नामच तारक आहे हे माणसांना सांगावेत. नाममहिमा सांगावा.
- विविध दिशांना असलेल्या पवित्र क्षेत्री भगवंताच्या अवतारांच्या लीला लोकांना सांगाव्यात.
- लोकांमध्ये भक्ती उत्पन्न करावी.
- पूर्वीचे संस्कृतमधील ग्रंथांचे सार प्राकृत भाषेत सांगावेत.

॥श्रीराम समर्थ॥