पापी कोणाला म्हणले जाते?

पापी कोणाला म्हणलं जातं -

१) ब्राह्मणांची हत्या करणारे
२) दारू पिणारे
३) गाईची हत्या करणारे
४) स्त्रिया व मुलांची हत्या करणारे
५) गर्भपात करणारे
६) गुरुंची संपत्ती लुबाडणारे
७) देवाब्राह्मणांचे संपत्ती चोरणारे
८) स्त्रिया व मुलांचे धन चोरणारे
९) कर्ज बुडवणारे
१०) विश्वासघात करणारे
११) विष पाजून हत्या करणारे
१२) दोषांना स्वीकारणारे
१३) गुणांची निंदा करणारे
१४) गुणवानांचा मत्सर करणारे
१५) नीच लोकांबरोबर मैत्री करणारे
१६) संतसंगतेपासून लांब राहाणारे
१७) तीर्थक्षेत्रातील सज्जनांची, सत्कर्मांची, गुरु आणि देवतांची निंदा करणारे
१८) वेद, पुराणे, शास्त्र यांच्याकडे दोषदृष्टीने पाहाणारे
१९) दुसर्‍याच्या दु:खाने सुखी होणारे
२०) सुखी माणसाला दु:ख देणारे
२१) दुष्टपणे बोलणारे
२२) दुष्टचित्त असणारे
२३) कोणी हिताचे सांगितले तर न ऐकणारे
२४) शास्त्रामध्ये जे करायला सांगितले ते न ऐकणारे
२५) स्वत:ला शहाणे समजून गर्वामध्ये मस्त राहाणारे
२६) स्वत: मूर्ख असूनही स्वत:ला पंडित मानणारे
२७) माता, पिता, गुरु, आचार्य आणि पूज्य लोकांचा अपमान करणारे
२८) आपल्या पतिव्रता, सुशील, कुलीन, विनयी पत्नीला द्वेषभावनेने सोडून देणारे
२९) ब्राह्मणांना योग्य दक्षिणा न देणारे, ब्राह्मणांना बोलावूनही नंतर जायला सांगणारे, दान देऊनही पुन्हा ते दान काढून घेणारे
३०) दान देऊन नंतर त्याबद्दल पश्चात्ताप करणारे
३१) दुसर्‍याच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेणारे
३२) दिल्या जाणार्‍या दानाला थांबवणारे
३३) यज्ञाचा विध्वंस करणारे
३४) कथा सांगताना विघ्न आणणारे
३५) दुसर्‍याचे शेतजमीन बळकावणारे, कब्जा घेणारे
३६) गायरानावर शेती करणारे
३७) ब्राह्मण असूनही गाईचे दूध, तूप विकणारे
३८) यज्ञाविना पशूंची हत्या करणारे
३९) ब्रह्मकर्म न करता मांस करणारे
४०) शूद्र असूनही वेदांचे अध्ययन करणारे, जानवे घालणारे, ब्राह्मण मुलीशी लग्न करणारे
४१) राजाच्या बायकोची भोगेच्छा मनात धरणारे
४२) स्वत:च्या मुलींचा उपभोग घेणारे
४३) पतिव्रता परस्त्रियांना भोगणारे
४४) निषिद्ध आचरण करणारे
४५) आपल्या मृत नातेवाईकांचे अग्निसंस्कार न करणारे
४६) खोटी साक्ष देणारे
४७) खोटा धर्म आचरणारे
४८) कपटाने धन मिळवणारे
४९) चोरीचा व्यवसाय करणारे
५०) उंच वृक्षांना तोडाणारे, बागबगीचे उध्वस्त करणारे
५१) विधवांचे शील लुटणारे

॥श्रीराम समर्थ॥