कर्म-कर्मफल-पुनर्जन्म

कर्म-कर्मफल-पुनर्जन्म -

मनुष्ययोनी सोडून सर्व भोगयोनी आहेत.

मनुष्य म्हणून जन्म घेतल्यावर माणूस ज्याप्रकारे कर्म करतो त्याप्रमाणे त्याला त्याचे पाप-पुण्य असे फल मिळते.

मी कर्ता हा देहबुध्दीचा भाव अज्ञानामुळे असल्याने हे घडते.

---------------------------------

  • पाप व पुण्य जेव्हा समान होते तेव्हा त्याला मनुष्यदेह मिळतो.
  • पाप जेव्हा पुण्यापेक्षा अधिक होते तेव्हा त्याला नरकयातना भोगाव्या लागतात.
  • पुण्य जेव्हा पापापेक्षा जास्त होते तेव्हा तो स्वर्गात जातो.

-----------------------------

नरकयातना संपल्यावर नरकातून व पुण्य संपल्य़ावर स्वर्गातून पृथ्वीवर विविध योनींमध्ये पुनर्जन्म मिळतो.

अज्ञानाने पाप कोणते व पुण्य कोणते हेच सर्वसामान्य माणसाला माहित नसते. किंवा माहित असले तरी त्याला त्याची फले माहित नसतात.

यासाठी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न गरुडपुराणात व देवीभागवतात केलेला आहे.

॥श्रीराम समर्थ॥