प्रारब्धाचा इथे कसा संबंध लावतात?

प्रत्येक जीव कर्म करीतच असतो.
कर्माशिवाय कोणालाही राहता येत नाही.
"मी कर्ता" या भूमिकेतून तो कर्मे करतो.
कर्म करताना त्यामागचा हेतू महत्वाचा असतो.

- अघोरी असेल तर ते तमोगुणी कर्म
- स्वार्थप्रेरित असेल तर ते रजोगु्णी कर्म
- निस्वाःर्थी असेल तर ते सत्वगुणी कर्म

त्यामुळे कर्माचा दोष प्रत्येकाला लागतो.
मृत्यूनंतर पाप व पुण्यकर्मांची उजळणी होते.

  • पापकर्म जास्त असतील तर नरकयातना
  • पुण्यकर्म जास्त असेल तर ते संपेपर्यंत स्वर्गाचे भोग
  • दोन्ही सारखे असेल तर पृथ्वीलोक.

मागील कर्मांप्रमाणे जन्म मिळतो -
- भोगयोनी (पर्वत, नद्या, सरोवर, कीटक, जलचर, सरपटणारे प्राणी, चतुष्पद प्राणी, पक्षी, गवतापासून ते मोठया वृक्षापर्यंतच्या वनस्पती, इ.
- कर्मयोनी (मानवयोनी)
माणसांमध्ये सुध्दा मागील कर्मांच्या गोळाबेरजेप्रमाणे जन्म व सुखदुःख मिळतात.
- जन्म कोठे, कधी, कोणाच्या पोटी हे आपल्या हाती नाही (जन्मदाते)
- अन्न कधी-कोणते-किती मिळणार आपल्या हाती नाही (व्यवसाय)
- आपले कोणाशी लग्न होणार, आपल्याला वैवाहिक सुख किती-कसे-कधी मिळ्णार आपल्या हाती नाही.
- आपल्याला मुले होणार की नाही, किती, केव्हा, कशी हे आपल्या हाती नाही.
- जमीनजुमला, धनदौलत, गाडी, पशूधन, दागदागिने, पैसाअडका, समाजातली पत
आपल्या हाती नाही.
- आपले आरोग्य, अनारोग्य, व्याधी, मृत्यूचे कारण, मृत्यूचा काल-वेळ आपल्या हाती नाही.
- प्राण जाताना आपण या जगातील वस्तू बरोबर घेऊन जात नाही. मात्र आपल्या वासना आपल्या बरोबर येतात.
---------------------------------------------------
तरीही आपला मीपणा, हव्यास संपत नाही.
प्रत्येक जन्म आपण मागच्या वासना भागवण्यासाठी वापरतो.
नवीन वासना निर्माण करून त्या अपुर्‍या ठेवून आपण मरतो.
जिवाच्या जन्म-मृत्यूचे हे चक्र अनंत भगवंताची अनंत माया चालू ठेवते.

- भगवंताच्या इच्छेने हे चक्र चालते.
- जे आपण जन्मताना घेऊन येतो व या जन्मात भोगतो ते प्रारब्ध.

॥श्रीराम समर्थ॥