भगवंताचे अनंत अवतार

अवतार - अव+तृ
अव - खाली
तृ - तारणे
खाली (पृथ्वीवर) येऊन तारणे/रक्षण करणे

या अनंत कालावधीत भगवंताचे अनंत अवतार कैकवेळा होऊन गेले व अजून होणार आहेत.

---------------------------------------------------------

भगवंताने अवतार घ्यावा असे कोणाला व का वाटते?

- जेव्हा पृथ्वीवर आसूरी (विघातक) शक्तींच्या वर्चस्वाखाली सर्व सृष्टी वेठीला धरली जाते.
- जेव्हा सज्जनांचा उपमर्द, घात, अवहेलना होऊ लागते.
- जेव्हा सर्व जीव मेटाकुटीला येतात.
- जेव्हा गाईच्या रुपात पृथ्वी व वृषभाच्या रूपात धर्म, अनेक सिध्द-महात्मा-ऋषी-मुनी-देवदेवता यांना बरोबर घेऊन ईश्वरापाशी जातात व त्याची स्तुती गातात, त्याच्यापुढे परिस्थितीचे कथन करतात व सर्वांना यातून वाचवण्याची प्रार्थना करतात.
---------------------------------------------
भगवंताची योजना -

- "माझे लक्ष आहे आणि योग्यवेळी मी जन्म घेणार आहे, व माझे अवतारकार्य करणार आहे", असे भगवंत आश्वासन देतात.
- कधी, कोठे, कशा स्वरूपाचा हा जन्म असेल व कोणते अवतारकार्य असेल हे ही सविस्तर कथन करतात.
- इतरांनी विविध रूपात जन्म घेऊन या अवतारकार्याला कसा हातभार लावायचा आहे हेही सांगतात.
-----------------------
अवतार हे अनेक रुपात असतात -

१) सूक्ष्म - सध्याचा बुध्दावतार
२) पशू - मत्स्य, वराह, कूर्म, पंचकेदार,
३) अर्ध पशू अर्ध मनुष्य - नृसिंह
४) मानवरुपात -
अ) पुरुषरुपात -
श्रीविष्णूचे - वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, कल्कि
नारायण, बदरीविशाल,
श्रीशिवाचे - खंडोबा, मल्हारी-मार्तंड, वैजनाथ, सर्व ज्योतिर्लिंगे, महारुद्र म्हणून मारुति,
ब) स्त्रीरुपात - देवीचे सर्व अवतार, आदिमाया - श्रीसीता, श्रीलक्ष्मी, श्रीगौरी...श्रीराधा,
क) अंशावतार - सर्व सच्चे संत-भक्त (उदा. उध्दव, व्यास, श्रीरामदास, श्री ब्रह्मचैतन्य, श्री अक्कलकोटस्वामी, श्री आद्य शंकराचार्य, श्रीरामकृष्ण परमहंस, श्रीचैतन्य महाप्रभू, श्रीगजानन महाराज इ.)

देवांची वाहने/ देवांची आयुधे/ देवांचे गण-पार्षद हे ही अवतारकार्यात योग्य तो जन्म घेऊन भगवंताला मदत करतात.
उदा. शेष - नर, श्रीलक्ष्मण, श्रीबलराम, भरत, शत्रुघ्न,
------------------------------------------------------
या अवतारकार्याचे दोन भाग असतात -
१) दुष्टांचे निर्दालन करणं
२) सुष्टांचे रक्षण करणं

ध्येय -
पडझड झालेल्या धर्माची स्थापना करणं.
सत्य, तप, दया, दान हे धर्माचे ४ स्तंभ आहेत.
--------------------------------------------------------------
ज्या असूरांचा संहार होतो त्यांच्यापैकी जे भगवंताकडून मारले जातात त्यांना मोक्ष मिळतो कारण भगवंताचा झालेला प्रत्यक्ष स्पर्श.
भगवंताच्या स्पर्शाने त्यांच्या बुध्दीवरचे अज्ञानाचे पटल जाते व परमेश्वराची खरी ओळख होते, आत्मज्ञान झाल्याने व संपूर्ण शुध्द झाल्याने तो परमेश्वरामध्ये विलीन होऊन जातो.

॥श्रीराम समर्थ॥