सत्शिष्य

सत्‌शिष्याची वैशिष्ट्ये-

१) सद्‌गुरुप्रमाणेच भगवंताचे अवतार / अंश.
२) मागील जन्मात अवताराची पूर्वतयारी.

३) भगवत्‌भक्ती सलग १५/२० पिढ्यांत चालू असलेले घराणे जन्म घेण्यासाठी निवडणे.
४) मातेला वेगळ्याच प्रकारचे डोहाळे - ध्यानसमाधी, नामस्मरण, एकांतसेवन.
५) सहजसुलभ बाळंतपण.
६) मातेची आतुरता, आकांक्षा, अवतारी अंश पोटी यावा अशी (मागील जन्मीची) इच्छा.
७) लहानपणी हूडपणा, लौकिक विद्याग्रहणाचा कंटाळा.
८) लहानपणी काही आघात, वियोग, दुरावा, निंदा, अपमान, अवहेलना, दारिद्र्य, छत्र नाहीसं होणं, लहानपणी कुटुंबात मन न लागणं.
९) उपनयनापूर्वीच स्वत:ची गुप्त साधना - नामस्मरण, अरण्यवास, स्मशानाची भीती न वाटणं, ध्यानसमाधी, भजन – पूजन यांची विशेष गोडी, आवड, शांत, समाधानी स्वभाव.
१०) उपनयनानंतर सद्‌गुरुभेटीची प्रचंड तळमळ, ओढ, आस.
११) लौकिक गोष्टीत आवड नसणं - व्यवसाय, पैसा, मानमरातब, विवाह, इस्टेट, नावलौकिक, पुत्र, पौत्र, नातेवाईक, खाणं, पिणं, निद्रा, गप्पा, निंदा, आळस यापासून दूर.
१२) सद्‌गुरुचा खडतर शोध, भारतभ्रमण करताना अनेक प्रकारच्या साधना, साधनी लोक, देश–प्रांत यांतून शहाणपण येणं, आपल्याला नेमकं काय हवंय, कोण आपला गुरु असावा याविषयी स्पष्टता येत जाणं.
१३) सद्‌गुरुचा शोध लागत नाही हे पाहून येणारी निराशा, हताशा, शरण जाण्याची पूर्वतयारी, ‘तू सोडून मला कोणताही ध्यास नाही, आस नाही. एकत्र तू तरी नाही तर मृत्यू तरी’ अशी अवस्था होऊन जाणं, संपूर्ण शरणागतीची पूर्वतयारी होणं.
१४) भूक तहान झोप नाहीशी झालेली, देहबुद्धी क्षीण झालेली, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणार नाही याची संपूर्न खात्री झालेली, गुरुची कृपा संपादन करण्यासाठी त्याच्या आज्ञेचे संपूर्ण पालन करण्याची संपूर्ण तयारी झालेली.
१५) आईवडील, बायको/नवरा, मुलं, नातेवाईक, घरदार, कशाचविषयी पाश न राहणं, ‘माझं सर्व काही तूच आहेस’, असं गुरुविषयी वाटण्याची स्थिती सिद्ध झालेली, काहीही सोसावं लागलं, खडतर अमानुष परीक्षा, कसोट्या घेतल्या तरी सद्‌गुरुंवर संपूर्ण श्रद्धा, प्रेम, एकात्मभाव, त्यांच्या सद्‌हेतूविषयी किंतु नसणं इतकी तयारी, ‘मी’पण, ‘मी’ कर्ता, ‘मी’ कोणीतरी हा वृथा अभिमान संपूर्ण गळून जाण्याची तयारी झालेली.
१६) दोघांची भेट - एकमेकांना पारखणं, दोघांची लगेच एकात्मता होणे. सद्‌गुरुनं आपण कोण आहोत, तू कशासाठी आला आहेस . . . याची खूण सांगणं.
१७) दोघांचं निकटचं सान्निध्य, हृदयाशी घेणं, आत्मज्ञान देणं, आशीर्वाद देणं, कठोर तपाचरणाची आज्ञा करणं, तप चालू असताना हरतर्‍हेच्या परीक्षा घेणं, धीर, संयम, श्रद्धा यांची पराकाष्ठा होणं.
१८) संपूर्ण देहाभिमान गळून गेल्यानंतर आत्मसाक्षात्कार, निर्विकल्प समाधी.
१९) काही काळची विजनवासातील उन्मनी अवस्था, देहाविषयी संपूर्ण औदासिन्य, कोण्या भाविकाने केलेली सेवा.
२०) तपाचरण संपूर्ण होणं, संपूर्ण सिद्धावस्था, अवतारकार्याची पूर्वतयारी,
२१) गुरुने अज्ञानी, मूढ, तमानं धुंद झालेल्या लोकांना प्रकाशवाट दाखविण्याचे कार्य सोपविणे - कार्याचे स्थान, उपासना पद्धती यांची निश्चिती होणे.
२२) संन्याशाच्या वेषात, स्थितीत मूळ घराणं, कुटुंबाला भेट देणं व अवतारकार्यासाठी प्रयाण करणं.
२३) लोकोध्दाराच्या कार्याचे स्थान – ओसाड, दारिद्र्य, अज्ञानी लोक, अन्याय सहन करीत जगणारे.

॥श्रीराम समर्थ॥