जीवात्मा

मी एक साधनी:
आत्मा-परमात्मा हे शब्द नेहमी वाचनात ऐकिवात असतात, त्यांचा अर्थ नेमका काय आहे? ते शब्द मला परके का वाटतात? जीवात्मा कसा असतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
जीवात्मा कायम असतो.
हा अविनाशी आहे.
आत्मा कोणालाही मारत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही.
आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही.
हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन, आणि प्राचीन आहे.
या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत.
विस्तव जाळू शकत नाही.
पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
हा अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य आणि अशोष्य आहे.
हा आत्मा नित्य, सर्वदत, अचल, स्थाणु (स्थिर रहाणारा) आणि सनातन आहे.
हा अव्यक्त, अचिंत्य, आणि विकाररहित आहे.

॥श्रीराम समर्थ॥