योगभ्रष्ट माणसाला मिळणारी गती

मी एक साधनी:
सत्कर्मी तरीही पूर्ण युक्त न झालेल्या माणसाची (योगभ्रष्ट) मृत्यूनंतरची गती काय असते?
माझ्या मनातील सद्गुरु:
अंतकाळी तो संयमी नसल्यानं योगापासून विचलित होतो.
तो अधोगतीला जात नाही.
पुण्यकृतांच्या लोकांमध्ये पुष्कळ वर्षे निवास करुन नंतर श्रीमान व शुध्द असणार्‍या माणसांच्या घरात जन्माला येतो.
अथवा ज्ञानवान योग्यांच्या कुळात जन्म घेतो.
पूर्वीच्या शरीरात संपादित केलेल्या बुध्दीचा लाभ त्याला मिळतो.
त्यामुळे परमात्म्याच्या सिध्दीसाठी तो जास्त प्रयत्न करतो.
श्रीमंत घरातील योगभ्रष्ट आणि योगाभ्यासू भगवंताकडे आकर्षिला जातो व वेदांतील सकाम कर्मांच्या फळांना उल्लंघून जातो.

॥श्रीराम समर्थ॥