परमात्मा या त्रिगुणी मायेपेक्षा वेगळा कसा

मी एक साधनी:
परमात्मा या त्रिगुणी मायेपेक्षा वेगळा कसा असतो? त्याला जाणणं सामान्य माणसाला एवढं कठीण का असतं?
माझ्या मनातील सद्गुरु:
परमात्मा या तीन गुणांच्या अलिकडे अव्यय असा आहे.
त्य़ामुळे त्याला कोणी जाणू शकत नाही.
परमात्मा मनुष्यरूप आणि त्यामुळे माणसांसारखाच आहे असं मूढ मानतात. प्रत्यक्षात परमात्मा सर्वश्रेष्ट, अव्यय, परम व अव्यक्त असा आहे.
परमात्मा त्याच्याच योगमायेने झाकलेला आहे. म्हणून कोणी त्याला पाहू/जाणू शकत नाही.
तो अज व अव्यय असूनही माणसं त्याला जन्म-मृत्यू असणारा समजतात.
पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातल्या आणि भविष्यात होणार्‍या सर्व भूतांना परमात्मा जाणतो. परंतु त्याला कोणी जाणत नाही.

॥श्रीराम समर्थ॥