भेदाची निर्मिती

मी एक साधनी:
जन्माला येणार्‍या माणसांमध्ये हे भेद कशामुळे असतात? ही भेदयुक्त जगाची निर्मिती कोण करतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
जगामध्ये हा दिसणं हा परमात्म्याच्या त्रिगुणी मायेचा प्रभाव आहे.
ही माया दैवी व गुणमयी आहे, ती तरुन जायला फार कठीण आहे.
जे परमात्म्याला निरंतर भजतात तेच या मायेतून तरून जातात.
ही माया जिवाचे स्वरूपाविषयीचे (जीवात्म्याविषयीचे) ज्ञान हिरावून घेते.
त्यामुळे मूढ-अज्ञानी जीव परमात्म्याला भजत नाहीत कारण तीन गुणांच्या भावांमुळे हे सर्व जग मोहित होतं.

॥श्रीराम समर्थ॥