अज्ञानी भक्त कसे असतात?

मी एक साधनी:
अज्ञानी माणसं भगवंताशी कशी वागतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की,
देवतांचे पूजन,
पितरांचे पूजन,
भूतांचे पूजन व
प्रत्यक्ष माझे पूजन अशा चार प्रकारे माझे पूजन केले जाते.
पूजनाच्या प्रकारानुसार त्या त्या पूजकांना फले प्राप्त होतात.
पहिल्या तीन प्रकारांमध्ये माझेच पूजन केले जाते परंतु ते सकाम व अज्ञानाधारित असते.
देवता, पितर व भूत यांच्या रूपात मला पूजणारे मला तत्त्वत: जाणत नसल्याने च्युत होतात व पुनर्जन्म घेतात.
देवतांचे पूजन करणारे देवतांप्रत प्राप्त होतात,
पितरांचे पूजन करणारे पितरांप्रत प्राप्त होतात तर
भूतांचे पूजन करणारे भूतांप्रत प्राप्त होतात.
-----------------
अश्रध्द परमात्म्याचा परमभाव न जाणणारे व स्वर्गभोगाची कामना करणारे असतात.
ते मनुष्याचे शरीर धारण करणार्‍या भगवंताला यथार्थ जाणत नाहीत. (तो परमेश्वर आहे हे न समजता त्याला सामान्य मनुष्य समजतात.)
ते मोघाशा (व्यर्थ आशा धरणारे) असतात.
ते मोघकर्मणी (व्यर्थ कर्म करणारे) असतात.
ते मोघज्ञान (व्यर्थ ज्ञान असणारे) असतात.
ते विचेतस (चंचल चित्त असणारे) असतात.
राक्षसी व आसुरी व मोहिनी (मोहात पाडणार्‍या) प्रकृतीचा ते आश्रय करून राहातात.

स्वर्गभोगाची कामना करणारे हे भक्त, ३ वेदांनी विहित केलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापरहित, यज्ञाच्या द्वारा माझी पूजा करून स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करणारे असतात.
हे स्वर्गलोक प्राप्त करून घेतात, दिव्य भोग भोगतात, पुण्य क्षीण झाल्यावर मृत्यूलोकांत येतात.

॥श्रीराम समर्थ॥