ज्ञानी भक्त कसे असतात?

मी एक साधनी:
ज्ञानी भक्तांचे वर्णन भगवंत कसे करतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
ज्ञानीभक्त परमात्म्याचा परमभाव जाणणारे असतात.
ते दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात.
ते भगवंताला अव्यय स्वरूपात जाणतात.
भगवंत सांगतात की असे ज्ञानी अनन्य मनाने मला भजतात.
ते दृढव्रती असतात.
ते सतत माझ्या नामगुणांचे कीर्तन करतात.
माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात.
मला वारंवार प्रणाम करतात.
माझ्या ध्यानात नित्य युक्त रहातात.
माझी उपासना करतात.
काही (दुसरे) ज्ञानयज्ञाच्या द्वारा निर्गुण ब्रह्माची पूजा करतात,
काही माझ्या विश्वतोमुख रूपाची पृथक्‌ भावाने उपासना करतात.
प्रत्यक्ष माझे पूजन हे निष्कामपणे व सज्ञानानेच (मला तत्त्वत: जाणून) केले जाते. परंतु प्रत्यक्ष माझेच पूजन करणारे माझे भक्त मलाच प्राप्त करून घेतात. प्रत्यक्ष माझे पूजन करणार्‍या माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.

॥श्रीराम समर्थ॥