कर्ता असून अकर्ता

मी एक साधनी:
परमात्मा देहरुपात कर्मे का करतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
याचे उत्तर भगवंत असे सांगतात की, तीनही लोकांत मला कोणतेही कर्तव्य नाही, मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरीही मी कर्मे करीत असतो.
जर का मी सावध (अतन्द्रित) राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल. कारण माणसे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात.
म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन.
------------------------------------------
मी एक साधनी:
परमात्मा कर्ता असूनही अकर्ता कसा?
माझ्या मनातील सद्गुरु:
भगवंतच याचे उत्तर असे देतात की, मी चातुर्वर्णांची निर्मिती केली आहे,
ही निर्मिती मी गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार केली आहे,
मी कर्ता असूनही मी अव्यय असा अकर्ता आहे.
कर्माच्या फळाची मला स्पृहा नाही,
त्यामुळे कर्मांचे मला बंधन होत नाही.

मी सर्वव्यापी असून कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही.

अशा या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी साधना कशी करावी हे भगवंतानेच अर्जुनाच्या निमित्ताने गीतेत कलियुगातील अज्ञानी पण जिज्ञासू मानवाला सांगितले आहे.

॥श्रीराम समर्थ॥