मोक्ष - मुक्ती

मोक्ष - मुक्ती
-------------------------
चार प्रकारची मुक्ती -
सकाम भक्ती करणारे भक्त पहिल्या तीन प्रकारची मुक्ती मिळवतात

१) सलोक - वैकुंठ लोक मिळण्यासाठी भगवंताची भक्ती करणारे ही मुक्ती मिळवतात.
२) समीप – ज्यांना भगवंताच्या सहवासाची इच्छा असते ते ही मुक्ती मिळवतात.
३) सरूप – जे लोक भगवंताच्या रूपाची इच्छा करतात, ते चतुर्भुज, सायुध, सवर्ण, होतात. त्यांच्या छातीवर श्रीवत्सलांच्छन नसते. (भृगू ऋषींनी छातीवर लत्ताप्रहार केल्यामुळे उठलेले वण) ते ही मुक्ती मिळवतात.
४) सायुज्य – अभेदभावाने जे भगवंताचे भजन करतात, ज्यांना देहाभिमान नसतो, ज्यांना देहदु:ख होत नाही, सर्व ठिकाणी भगवंतालाच पाहातात, आपणच अभंग असा सर्वात्मा आहोत असा ज्यांचा भाव असतो. ते ही मुक्ती मिळवतात.

॥श्रीराम समर्थ॥