संसारचक्र

मी एक साधनी:
निर्मात्याने हे जग भलं-बुरं का निर्माण केलंय? या जगाचं नंतर काय होतं?

माझ्या मनातील सद्गुरु:
भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की मी अव्यक्त मूर्ती आहे,
माझ्यामुळे हे सर्व जग परिपूर्ण आहे,
सर्व भूते माझ्यात स्थित आहेत, मी त्यांच्यामध्ये अवस्थित नाही,
माझ्या ईश्वरीय योगशक्तीने मी भूतांना उत्पन्न करणारा आहे, भरण पोषण करणारा आहे, तरीही माझा आत्मा त्यांच्यात नाही.
आकाशात सदैव महान वायू स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्यामधेच स्थित असतात,
कल्पाच्या अंती सर्व भूते माझ्या प्रकृतीत लीन होतात,
कल्पाच्या आरंभी मी त्यांना पुन्हा उत्पन्न करतो.
माझ्या मायेचा अंगीकार करून पराधीन भूतसमुदायाला मी पुन्हा पुन्हा त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो.
या कर्मात मी आसक्त नसल्याने व मी उदासीन असल्याने ही कर्मे मला बंधनात पाडत नाहीत.
माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते.
या हेतूने हे जग फिरत आहे.

॥श्रीराम समर्थ॥