अर्जुनाला जाणवलेला परमात्मा

मी एक साधनी:
दिव्य चक्षु भगवंताने अर्जुनाला प्रदान केल्यानंतर त्याला जाणवलेला परमात्मा कसा होता?

माझ्या मनातील सद्गुरु:
अर्जुनाला असं जाणवलं की परमात्मा हा परम ब्रह्म आहे.
तो परम धाम आहे.
तो परम पवित्र आहे.
ऋषीगण त्याला सनातन, दिव्यपुरुष, आदिदेव, अज, विभु मानतात.
तो भूतांना उत्पन्न करणारा आहे.
तो भूतांचा ईश्वर आहे.
तो जगाचा स्वामी आहे.
तो पुरुषोत्तम आहे.
तोच त्याला जाणतो.
तो त्याच्या दिव्य विभूतींच्या द्वारा लोकांना व्यापून राहिला आहे.
तो अक्षय काल आहे.
तो विश्वतोमुख आहे.
तो सर्वांना धारण करणारा आहे.
तो जाणून घेण्यास योग्य आहे.
तो परम अक्षर आहे.
तो जगाचा परम आश्रय आहे.
तो सनातन धर्माचा रक्षक आहे.
तो अव्यय आहे.
तो सनातन आहे.
तो पुरुष आहे.
तो चराचर जगाचा पिता आहे.
तो सर्वात मोठा गुरु आहे.
तो अतिपूजनीय आहे.
त्याच्या इतका प्रभावशाली तीनही लोकांत कोणीही नाही.

॥श्रीराम समर्थ॥