मनुष्यदेहाचं महत्व

मनुष्यदेहाचं महत्व
---------------
जे भयंकर पापी असतात ते विश्वप्रलयापर्यंत नरकातच राहातात जेव्हा पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा ते पुन्हा नरकातच उत्पन्न होतात किंवा यमराजाच्या आज्ञेने पृथ्वीवर येऊन गवत, कंद, गुल्म, झुडुपे,

पर्वत या स्थावर रूपांत जन्म घेतात. कीटक, पशू, पक्षी, जलचर अशा चौर्‍यांशी लक्ष योनींना भोगयोनी म्हणतात.

या सर्व योनींमधून भ्रमण केल्यानंतर त्या जीवाला मनुष्ययोनी मिळते. ४ लक्षवेळा विविध प्रकारचे मनुष्यजन्म भोगल्यानंतर त्या जीवाची मोक्षाची वेळ येते.

परमात्म्यापासून निघाल्यापासून त्याच्यामध्ये विलीन होईपर्यंत न मोजता येण्याएवढा काल जातो.

या काळात सर्व प्रकारचे जन्म व भोग घेतलेला जीव सुख-दुःखाच्या चक्रातून कायमचा मोकळा व्हायला आतूर होतो.
संपूर्ण निर्वासन झाल्याशिवाय मुक्ती संभवत नाही.
जिथे काम (इच्छा) आहे तिथे राम नाही.

॥श्रीराम समर्थ॥