सत्य लोकाचे वर्णन

सत्य लोकात राहाणार्‍या लोकांचे वर्णन -

सत्य लोकांत कोणाला प्रवेश असतो? -

१) गायत्रीमंत्राचा जप करणारे.
२) ब्राह्मणांचे चरणतीर्थ प्राशन करणारे.
३) यज्ञयागांचे निष्काम उपासक.

४) ब्राह्मणांच्या कार्याकरता मृत्यू पावलेले.
५) गोरक्षणाकरता प्राण दिलेले.
६) परोपकार करता करता दरिद्री झालेले.
७) निष्काम बुद्धीने ब्राह्मणांची सेवा करणारे, ब्राह्मणांची पूजा करणारे, ब्राह्मणांना भोजन घालणारे.
८) दीनजनांवर उपकार करण्यासाठी कृपाळू झालेले.
९) सत्य बोलणारे, सात्विक वृत्तीचे.
१०) परनिंदेविषयी मुके, परस्त्रीविषयी नपुंसक, परद्रव्यापासून पराङ्‌मुख.
११) मूळासह सर्व संकल्पांचाच त्याग करणारे.
१२) अंत:करणापासून अत्यंत विरक्त
१३) निरंतर ॐकाराचा जप करणारे.
१४) मरणसमयी बुद्धी चंचल न झालेले.

सत्य लोकांमध्ये राहाणार्‍यांची गती -
१) या लोकांमध्ये उपलब्ध भोगांमध्ये जे आसक्त होतात, त्यांचे पुण्य भोगांमुळे क्षीण होते व त्यानंतर त्यांचे पतन भूलोकात होते.
२) जे भोगांविषयी विरक्त राहातात ते ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात.

॥श्रीराम समर्थ॥