माणसाकडून अपेक्षित धर्माचरण

माणसाकडून अपेक्षित धर्माचरण
---------------------
माणसावर अनेक ऋण असतात. माणसाचा जन्म ही ऋण फेडण्यासाठी असतो.

या जन्मातील कर्तव्ये -

१) मातृऋण - गर्भ वाढवल्याचे, जन्म दिल्याचे,

पालनपोषण केल्याचे, संस्कार केल्याचे, खस्ता खाल्याचे
कसे फेडायचे - तिच्याशी आदरपूर्वक वर्तन करुन, तिला म्हातारपणी सांभाळून, तिचे मृत्यूनंतरचे दिवस करुन, तिचे नियमित श्राध्द करुन, तिच्या सद्‌गतीसाठी मातृगयेला श्राध्द करून
२) पितृऋण - कुलाचे अधिकार दिल्याचे, पुण्य मिळाल्याचे,
कसे फेडायचे - पित्याशी व संबधित सपिंडांशी आदराने वागून, पित्याचे मृत्यूनंतरचे दिवस करून, त्याचे व सर्व पितरांचे प्रतिवर्षी श्राध्द करून, पितृगयेला पितरांच्या सद्‌गतीसाठी श्राध्द करून,
३) देवऋण - यज्ञामध्ये हव्य देऊन, विविध दाने देऊन
४) ऋषीऋण - सर्व धर्मग्रंथांचा आदर करून, धर्मपालन करणार्‍या ब्राह्मणांचा आदरसत्कार करून
५) भूतऋण - तहानलेल्या/भुकेलेल्या जिवांना अन्न-पाणी-निवारा देऊन, त्यांच्यावर दया करून, चुकून हिंसा झाली तर क्षमायाचना करून

या सर्वांचे आशीर्वाद मनुष्याला पारमार्थिक उन्नतीसाठी आवश्यक असतात.
-----------------
मागील जन्मातल्या कर्माचे प्रायश्चित्त -

याशिवाय़ त्याला मागच्या जन्मात केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यायचे असते.
भृगूसंहितेत/अगस्त्यनाडीत सांगितल्याप्रमाणे दाने, परिमार्जन करण्याने चित्तशुध्दी होते व पारमार्थिक उन्नती झपाट्याने होते.
-------------------
पुढील चांगल्या जन्मासाठी -

निष्काम उपासनेने पुण्यसंचय केला असता तो पुढचा जन्म परमार्थाच्या दृष्टीने चांगला येण्यासाठी उपयोगी पडतो. पुढील जन्मात मोक्षासाठी अधिक चांगले प्रयत्न करता येतात. मोक्षासाठी आवश्यक साधना घडावी यासाठी योग्य शरीर-मन-बुध्दी-आचार-विचार-उच्चार याची तयारी या जन्मात करता येते.
--------------------
याच जन्मात मोक्ष मिळण्यासाठी -

- मागील जन्मातील व या जन्मातील सर्व कर्तव्ये पार पाडणे. कोणाशी देणे-घेणे बाकी नसणे
- लहानपणापासूनच मोक्षाला आवश्यक मनोभूमिका तयार असणे
- योग्य वयात सद्‌गुरुंनी स्वीकारणे व साधना करवून घेणे. संपून निर्वासन होण्याची तयारी होणे. सद्‌गुरुंशी एकरुप होऊन जाणे.
- सद्‌गुरूंची संपूर्ण कृपा होऊन अज्ञानाचे पटल कायमचे बाजूला होणे.
- आत्मज्ञान झाल्यावर सद्‌गुरु निर्दिष्ट साधना चालू ठेवणे, ते सांगतील ती कर्मभूमी स्वीकारून ते सांगतील त्याप्रमाणे लोकसेवेचे कार्य निर्लेपपणे करणे.
- वासनाबीज जळून गेल्याने पुढचा जन्म घेण्याची शक्यता जाते. देहाने माणूस पण अंतरंगी परमात्म्याचे अनुसंधान आणि आनंदाच्या डोहात बुडलेली अवस्था.
- सतत नामस्मरण केल्याने या जन्मी केलेल्या कर्माचे बंधन निर्माण होत नाही.
सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केल्याने तो आपले योगक्षेम चालवतो.

॥श्रीराम समर्थ॥