क्षेत्रोपाध्याय

क्षेत्रोपाध्याय
---------------
क्षेत्र - पवित्र स्थान
उपाध्याय - क्षेत्राच्या ठिकाणी राहून, येथील पाठशाळेत शिकून तयार झालेले व येथील मुख्य धार्मिक स्थानांच्या देवतांची विधीपूर्वक अर्चना करणारे गुरुजी

-------------
विविध क्षेत्रे
- प्रभास (पश्चिम - गुजराथ)
- दंडकारण्य (दक्षिण -महाराष्ट्र)
- आर्यावर्त (उत्तर - गंगायमुनेचा भाग)
- द्राविड (कर्नाटक, केरळ, तामिलनाडू)
- नाग (ईशान्य)
- काश्मिर (वायव्य)
-
---------------------------------
महत्व
प्रत्येक क्षेत्राचे, क्षेत्रपालाचे व तेथील प्रधान देवतेचे काही धार्मिक पौराणिक वैशिष्ठ्य असते उदा.
- स्पर्शदर्शन (उदा. काशी विश्वनाथ, श्रीओंकारेश्वर, श्रीऔंढ्यानागनाथ इ.)
- लांबून दर्शन (उदा. श्रीरामेश्वर, श्रीमहांकालेश्वर, श्रीद्वारकाधीश, कन्याकुमारी इ.)
- पूजासाहित्यातील वैविध्य (पत्री-फुले-अत्तर-नैवेद्य इ.)
- पर्वकाल (पहा ब्रह्मजिज्ञासा)
- उत्सवकाळ
- पूजाविधीतले वेगळेपण उदा - श्राध्दकार्य, पंचामृतीपूजा, बिल्वार्चन, तुलसीअर्चना, कुंकुमार्चन, गंधलेपन, भस्मार्चन, हवन इ.
- प्रत्येक ठिकाणचे वेद वेगळे असतात
उत्तरेला - ऋग्वेद
पश्चिमेला - सामवेद
दक्षिणेला - कृष्णयजुर्वेद
पूर्वेला - अथर्ववेद
- क्षेत्रोपाध्यायांचे उच्चारही थोडे वेगळे असतात, त्यावर त्यांच्या मातृभाषेचा थोडा परिणाम दिसतो.
------------------
आपण क्षेत्राच्या ठिकाणी धार्मिक विधी करण्यापूर्वी काय करावे?
- आपल्या ट्रॅव्हल कंपनीतील टूर मॅनेजरशी बोलून धार्मिक स्थानांची, तेथे करण्याच्या कार्यांची लागणार्‍या साहित्याची, अंदाजे लागणार्‍या दक्षिणेची सर्व आवश्यक माहिती घ्यावी
- आवश्यक ते कोरडे साहित्य आपल्या गावाहून वेगळ्या पिशवीत बरोबर न्यावे
- आपण नेमके काय करणार आहोत ते विचार करुन, आपल्या कुलोपाध्यायांशी बोलून ठरवावे.
- त्यानुसार गृहस्थांनी स्वच्छ धोतर-उपरणे, सोवळे-उपरणे, व सुवासिनींनी साडी-बांगड्या-जोडवी-मंगळसूत्र बरोबर घ्यावे व नेसावे. सुवासिनी स्त्रियांनी कपाळाला लाल कुंकू लावावे. हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात. मूल्यवान दागिने घालून गर्दीत जाऊ नये.
- कुमारी-विधवा-विधूर-संन्यासी-बटू इ. साठी स्वतंत्र उपचार असतात. ते समजून घ्यावेत.
- कुठे किती दक्षिणा द्यावी लागते याची आधीच कल्पना घ्यावी
- क्षेत्राच्या ठिकाणी पैशावरुन वाद घालू नयेत. घासाघीस करू नये
- श्राध्द करायचे असल्यास तीन पिढ्यांच्या पितरांची यादी (नाव-गोत्र-नातं) बरोबर घावी. ती भिजणार नाही यासाठी प्लॅस्टिकच्या फोल्डरमध्ये असावी.
- दानाच्या वस्तू क्षेत्राप्रमाणे वेगवेगळ्या पिशवीत ठेवाव्यात.
- क्षेत्राच्या ठिकाणी उपाध्याय सर्व माहिती देत असताना पूर्ण लक्ष द्यावे व आपण काय करायचे आहे ते ठरवून तसे त्यांना आपल्या नाव व गोत्रासह सांगावे.
------------------------------
हे सर्व का समजून घ्यायचं?
- आपण क्षेत्राच्या ठिकाणी जे काही कराल त्याचे १००० पट फल मिळते. वाईटाचे आणि चांगल्याचेही.
- क्षेत्राच्या ठिकाणी व्रतस्थ रहाणे आवश्यक असते - कामसेवन करुन पूजा, श्राध्द इ. करु नये.
- दारु, तंबाखू, परस्त्री/पुरुष सेवन करु नये.
- प्रधान देवतेच्या दर्शनापूर्वी क्षेत्रपालाचे दर्शन करवतात उदा. ज्योतिर्लिगाच्या ठिकाणी कालभैरवाचे जागृत ठाणे असते. तो सर्व क्षेत्रावर लक्ष ठेवून असतो. सावधानतेने वागावे.
- तेथील प्रसादअन्नाला नावे ठेवू नये. शक्यतो अन्न पानात टाकू नये.
- तेथील भिकार्‍यांशी उर्मटपणे वागू नये. शक्य तितके दान करावे.
- शक्य तितके सर्वांशीच सौजन्याने वागावे.

॥श्रीराम समर्थ॥