मह-जन-तप लोक

मह – जन – तप या लोकांत कोणाला प्रवेश मिळतो?

- गृहस्थाश्रमी असून ब्रह्मचारी (स्वप्नातही स्त्रीला स्पर्श करीत नाहीत)
- सदोदित भिक्षा मागून खाणारे.
- निरंतर कडकडीत वैराग्य धारण करणारे.

- आत्मज्ञानप्राप्तीकरीता सद्‌गुरुंची सेवा करणारे.
- अग्निहोत्र घेणारे.
- स्वधर्माने चित्त शुद्ध करणारे.
- ब्राह्मणांची व देवांची सेवा करणारे.
- प्राणीमात्रांवर दया करणारे.
- सत्यभाषी.
- सात्विक वृत्ती असणारे.
- आत्मज्ञान साध्य करणारे.
- गुरुभजनीरत.
- वानप्रस्थाश्रमी, कंदमूळे फ़ळांवर तृप्त होणारे.
- निष्ठेने तपश्चर्या करणारे.
- असे आचरण करता करता मृत्यू येणारे.
----------------------------------------------
मह, जन, तप लोकांमध्ये राहाणार्‍यांची गती -

१) या लोकांमध्ये उपलब्ध भोगांमध्ये जे आसक्त होतात, त्यांचे पुण्य भोगांमुळे क्षीण होते व त्यानंतर त्यांचे पतन भूलोकात होते.
२) जे भोगांविषयी विरक्त राहातात ते ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात.

॥श्रीराम समर्थ॥