महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई

श्रीतुकामाई
-----------------
महाराजांचं चरित्र वाचून आपल्या सद्‌गुरुंविषयी खोलवर जाणून घ्यावं असं अनुग्रहानंतर मला वाटलं.
त्याच दिवशी मी गोंदवल्याला चरित्र घेतलं. घरी जाऊन ते कधी एकदा वाचते असं मला झालं होतं.
अर्थातच, त्यांचे सद्‌गुरु कोण होते? ते कसे होते?

त्यांनी महाराजांना सत्शिष्य म्हणून कसं वागवलं? त्यांच्या कशा कसोट्या घेतल्या? महाराजांनी गुरुसेवा कशी केली?
महाराजांवर गुरुकृपा कशी झाली? माझ्या आजेगुरुंनी महाराजांना कोणता आदेश दिला?
इ. मला जिज्ञासा होती.
श्रीतुकामाईंबद्दल वाचताना मला आत खोलवर आनंद झाला, एक वेगळ्या प्रकारचं समाधान झालं.
त्यामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ठ्य जेवढं महत्वाचं होतं तेवढंच बेलसरेबाबांनी केलेलं संशोधन, अतिशय गोड, साध्या, प्रासादिक भाषेतलं त्यांचं लेखन याचा माझ्यावर खोल परिणाम झाला.
माझ्या सासर्‍यांची नाथपरंपरा असल्यामुळे गेली कित्येक वर्षे मी नाथसंप्रदायाबद्दल वाचत होतेच.
श्री अक्कलकोटस्वामी व श्रीशंकरमहाराजांचं अवलियेपण मला वाचायला फार आवडत असे.
तसंच मला श्रीतुकामाईंबद्दल वाचताना वाटलं.
त्यांच्याविषयी वाचणं वेगळं आणि लिहिणं वेगळं.
कितीतरी दिवस मनात असूनही मला हे लिहिणं अवघड गेलं

This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/4759719437577773766.htm?Book=Shreesant-Tukaramchaitanya-(Tukamai)
Price - Rs 35/-

॥श्रीराम समर्थ॥