महाराजांचे बोलणे/वाणी

महाराजांचे बोलणे/वाणी
----------------------
[संदर्भ - महाराज चरित्र - पान ३४०]
- महाराजांचे सारे व्यक्तिमत्व त्यांच्या चमकदार डोळ्यांमध्ये व विलक्षण वाणीमध्ये व्यक्त होत असे.
- त्यांच्या बोलण्यात व पाहण्यात एक विशिष्ट प्रकारची मोहिनी होती
- ज्याने त्यांचे बोलणे एकदा ऐकले तो जन्मभरात त्यांना विसरत नसे
- महाराज समोरचा माणूस ज्या प्रकारचा/व्यवसायाचा असेल त्याच्या भाषेत बोलायचे, त्याच्याच व्यवसायातली एखादी उपमा देऊन ते नामाचे महत्व समजाऊन सांगायचे. त्यामुळे ऐकणारा प्रसन्न होत असे.
- भगवंताच्या प्रेमाचे, भक्तीचे आणि नामाचे तसेच संतांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण करताना त्यांच्या वाणीला स्फुरण चढत असे. ते उत्तमोत्तम दृष्टांत सहज बोलून जात असत.
- महाराजांचे सहज भाषण सहजमधुर असे.
- समजुतदार माणसाला ते गोंजारुन नामाकडे वळवीत असत
- वाह्यात माणसाला खडसावून ताळ्यावरही आणत असत.
- महाराजांची भाषाशैली फारच हृदयंगम होती.
- महाराजांची भाषा अगदी धरगुती व सोपी असे. ती सर्व माणसांना त्यामुळे समजत असे.
- त्यांची वाक्ये लहान पण जोरकस असायची
- त्यांच्या वाणीला कृत्रिमतेचा लवलेश नव्हता.
- त्यांचे सांगणे ऐकणार्‍याच्या हृदयाला भिडत असे.
- अनेकवार केलेल्या भारतभरच्या पर्यटनामुळे सर्वसामान्य माणसांचं जीवन त्यांनी अतिशय जवळून पाहिलं होतं. त्यांचं प्रत्येक वाक्य वास्तवाला धरून असल्यानं ते ऐकणार्‍याच्या अंतःकरणाचा ठाव घेई.
- कधीकधी त्यांचा आवाज इतका चढत असे की ऐकणारा थरारुन जाई.
- ते अतिशय प्रतिभावान असल्याने त्यांची भाषा नेहमी ताजी वाटत असे.
- लोकांना भगवंताकडे वळवणे या कामासाठी त्यांनी आपली वाणी कामाला लावली.
- बेलसरेबाबा त्यांच्या वाणीचे गुण याप्रमाणे वर्णन करतात

 • - समुद्राची खोली, व गांभीर्य
 • - हिमालयाचा थोरपणा व निश्चितता
 • - गंगेची शुचिता व पवित्रपणा
 • - फार सोपे
 • - सत्य
 • - आशय व्यक्त करणारे
 • - अत्यंत शास्त्राला धरुन
 • - जिवंत, रसयुक्त
 • - चित्तवेधक
 • - परिणामकारक

- महाराजांची भाषा चाकोरीबाहेरची होती
- कोणतेही प्रमेय ते नवीन तर्‍हेने मांडत असत
- त्यांच्या बोलण्यात सहजपणे पदोपदी विनोद येत असे. तो खेळकरपणे व अर्थपूर्ण असे. तसेच तो सौम्य, स्वच्छ, रसयुक्त व आकर्षक असे.
- माणसाचा दोष ते त्याचे अंतःकरण न दुखवता दाखवत असत. त्यावेळी त्यांचे बुध्दीचातुर्य व निरीक्षणसामर्थ्य ऐकणाराच्या लक्षात येत असे.
- बोलताना ते

 • - मुद्राभिनय
 • - विपरीत तुलना
 • - विडंबन
 • - विसंगति
 • - कोटी
 • - विपर्यास

करीत असत.
- सर्व प्रकारच्या दुःखी जीवांना ते समाधानी करीत असत.
- भजनाच्या व कीर्तनाच्या वेळी त्यांचा आवाज अतिशय मृदू व मधुर वाटत असे.
- त्यांच्या वाणीचे सर्व पैलू त्यावेळी उमलत असत. त्यामुळे श्रोते देहभान हरपून जात असत.
- भाषणाचा वेग ते कमीजास्त करीत
- श्रोत्यांच्या भावनेला ते जागृत करित असत
- ते श्रोत्यांचा गौरव करीत व त्यांचे दोषही ते दाखवीत
- ते उत्स्फुर्तपणे काव्यही करीत
- त्यांचा प्रत्येक शब्द शास्त्राला धरुन व अनुभवाचा असे.
महाराजांचे अंतरंगच त्यांच्या वाणीतून बाहेर पडले.

॥श्रीराम समर्थ॥