वैकुंठ

वैकुंठाचे वर्णन -
श्रीभगवंताने स्वत:च्या सामर्थ्याने राहाण्याकरीता चैतन्यच मुशीत घालून, आटवून त्याचे वैकुंठ रचले.

भगवंताचे सगुण रूप –
सुकुमार, सुंदर, घनश्याम, मनोहर, ज्ञानमय.

शंख, चक्र, पद्म, गदा या आयुधांनी सज्ज चार भुजा.
मुकुट, कुंडले, मेखला, पीतांबर, गळ्यात कौस्तुभमणी, पायापर्यंत रुळणारी वनमाला.
चरणापासून निघालेली गंगा.
श्रीवत्सलांछन (श्रीभृगूऋषींच्या पावलाचा छातीवरचा ठसा)
श्रीचरण व श्रीमुख यांचे दर्शन अतीव सुखकारक.
प्रत्येक रोमरंध्रात कोट्यवधी ब्रह्मांडे राहतात.
साक्षात लक्ष्मी त्याची सेवा करते.

सगुण रूपाचे दर्शन झाले असता -
त्याचे दर्शन झाले असता अहंकाराची गाठ तुटून पडते, जन्ममरण नाहीसे होते, कर्माकर्म मुळापासून उपटले जाते.

वैकुंठात राहाणार्‍या लोकांचे (पार्षदांचे वर्णन) -
मेघश्याम वर्णाचे,
पीतांबर धारण केलेले,
हातात शंख, चक्र इ. आयुधे घेतलेले,
विष्णूसारख्याच रूपाचे,

वैकुंठात अजून काय आहे?
तिथे आधिदैविक, आधिभौतिक पीडा नाहीत.
तिथे विषयाची वार्ता नाही.
स्त्रीपुरुषांची बुद्धी सारखीच असते.
तहानभूक नाही, कामक्रोध नाही, सुखदु:ख, द्वंद्व नाही, जन्ममरण नाही.

॥श्रीराम समर्थ॥