योगवासिष्ठ ग्रंथाचे वैशिष्ठ्य

योगवासिष्ठ ग्रंथाचे वैशिष्ठ्य
----------------------------------
- अध्यात्मशास्त्रातील एक अपूर्व निर्मिती म्हणून या ग्रंथाला मान्यता मिळाली आहे.
- हा व्यापक आहे.
- सरस आहे.
- सर्वांगपरिपूर्ण आहे
- यात तत्वज्ञान व काव्य यांचा सुरेख समन्वय साधला गेला आहे.
- सर्वांनाच संसारसागरात मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ असा हा आहे.
- संसारात राहून त्यापासून सुटका कशी करून घ्यावी याची युक्ति सांगितली आहे.
- ब्रह्मविद्येचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी चित्तशुध्दी कशी प्राप्त करून घ्य़ावी याविषयी मार्गदर्शन केले आहे.
- यात अध्यात्मशास्त्राचा अधिकारी कोण याविषयी सांगितले आहे
- ज्ञानमूलक प्रवृतिमार्ग अवलंबिण्याची सूचना यात केलेली आहे.
- यात नीतीशास्त्राचे धडे आहेत
- ज्ञान व संरोध यांच्या मदतीने चित्ताचा उपशम होणे आवश्यक असे सांगितले आहे.
- आत्मज्ञान ही आत्मचिंतनाची परिणति आहे असे प्रतिपादन केले आहे
- हा ग्रंथ तत्वज्ञानदृष्ट्या संपूर्ण वेदान्तरूप आहे.
- अनेकविध मनोरंजक आख्यायिका/कथानके यात असल्याने हा इतिहासग्रंथही आहे.
- यातील तत्वप्रतिपादन हे सूक्ष्म अभ्यास करून झालेले, बुध्दीला पटेल असे आणि विचारप्रवर्तक आहे.

॥श्रीराम समर्थ॥