ब्रह्मांडाची उत्पत्ती

ब्रह्मांडाची उत्पत्ती - (जगाची निर्मिती)

 

या जगाची निर्मिती कशी झाली, ती कोणी केली, त्या निर्मात्याचा या मागे कोणता हेतू होता, अशीच अजून ब्रह्मांडे अस्तित्वात आहेत का? तिथे काय आहे? माझा आणि या सर्व सृष्टीचा नेमका संबंध काय आहे?

हे व असे प्रश्न पुरातन कालापासून जिज्ञासू माणसांना पडत आलेले आहेत. त्यापैकी कठोर तपाचरण करणार्‍या ऋषीमुनींना जे ज्ञान झाले ते त्यांनी इतर ऋषींना व आपल्या शिष्यांना ऐकवले. हे सर्व ज्ञान आपल्या वेदांतात (उपनिषदात) व पुराणातून आढळते. कलियुगातील धर्मभ्रष्ट अल्पबुध्दी, अल्पआयु असणार्‍या जिज्ञासू माणसांना कळावे यासाठी वेदव्यासांनी द्वापरयुगाच्या अंती वेदाचे विभाग केले. ते भाग विविध शिष्यांना शिकवले. अनेक पुराणे रचली. त्यात मूळ तत्व व्यासांनी करमणूकप्रेमी माणसांसाठी गोष्टीरुपात सांगितले.

या वेबसाईटमधील ग्रंथवाचन या विभागात नेमकी व मोजकी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

॥श्रीराम समर्थ॥