सर्ग (ब्रह्मांडाची उत्पत्ति)

सर्ग (ब्रह्मांडाची उत्पत्ति)
---------------------------------
काल हे परमात्म्याचे रूप प्रकृति व पुरुष यांच्यात संयोग घडवून आणते.
त्यातून महत्तत्व निर्माण झाले त्याला मूल प्रकृतिने आवृत्त केले.
त्यातून तीन प्रकारचे महत्तत्व - सात्विक, राजस व तामस यांनाही मूल प्रकृतिने आवृत्त केले.
महत्तत्वापासून अहंकार उत्पन्न झाला
१) भूतादि अहंकार
या अहंकारापासून ५ तन्मात्रा व ५ महाभूते निर्माण झाली.
(१) शब्द - आकाश
(२) स्पर्श - वायू
(३) रूप - तेज
(४) रस - आप (जल)
(५) गंध - पृथ्वी
-----------------------------------------
२) तैजस अहंकार
पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये यांची उत्पत्ति झाली
ज्ञानेंद्रिये - २ डोळे, २ कान, त्वचा, जीभ, नाक
कर्मेंद्रिये - २ हात, २ पाय, लिंग/योनी, गुद, वाणी
कर्मे -
१ - उत्सर्ग (बाहेर टाकणे)
२ - आनंद
३ - ग्रहण (घेणे)
४ - गमन (हालचाल करणे)
५ - भाषण (बोलणे)

॥श्रीराम समर्थ॥