काशी-रामेश्वर यात्रा

काशी-रामेश्वर यात्रा

काशीची गंगा (गंगेचं पाणी) कावडीत भरायचं ते श्रीरामेश्वरावर आणून घालायचं आणि तेथील वाळू घेऊन काशीला येऊन ती बिंदुमाधवावर अर्पित करायची ही यात्रा पूर्वापार चालत आलेली आहे. अजूनही काही साधू-संन्यासी ही यात्रा पायी करतात.
----------------------------
महाराजांनी ही यात्रा अनेकवेळा केल्याचं त्यांच्या चरित्रात वाचायला मिळालं होतं.
--------------------
प्रापंचिकांना हे झेपण्यासारखं नसल्यानं ते काशीची गंगा गडूत घेऊन येतात व सवडीने दक्षिणेकडे जाऊन श्री रामेश्वरावर अर्पित करण्यासाठी क्षेत्रोपाध्यायांकडे देतात. तेथील वाळू जमा केल्यावर उपाध्याय काही विधी करून त्यातील काही भाग बिंदूमाधवासाठी बाजूला कढून देतात. तो, आपल्या सवडीने काशीला घेऊन जाऊन तेथील क्षेत्रोपाध्यायांच्या देखरेखीखाली पूजा करून, अर्पण करतात.

॥श्रीराम समर्थ॥