महाराजांचा वाणीरुप अवतार

श्री तात्यासाहेब केतकर

श्रीमहाराज सन १८४५ मध्ये श्रीमारुतिरायाचे अंशावतार म्हणून आले व त्यांनी ६९ वर्षे देहात राहून आपले अवतारकार्य केले.

सन १९२५ मध्ये पुन्हा प.पू. श्रीतात्यासाहेब केतकर यांना सर्व दृष्टीने अत्यंत योग्य असे माध्यम समजून व पात्र समजून ते त्यांच्या मुखातून प्रकट झाले. तेव्हापासून ते १९६७ पर्यंत महाराजांनी वाणीरुपाने पुन्हा अवतारकार्य केले.

तात्यासाहेब श्रीमहाराज प्रकट झालेल्या क्षणापासून त्यांच्या अभिव्यक्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तात्यासाहेब नव्हतेच. त्यांचे व्यक्तित्व शून्य झाले. त्यांच्या मधून अनंताचे आविर्भाव प्रकट झाले. तात्यासाहेबांनी आपला सर्व प्रपंच श्रीमहाराजांच्या चरणी अर्पण केला. त्यांचे उठणे-बसणे, खाणे-पिणे, नोकरी-धंदा, घरदार, मुलबाळ सर्व महाराजमय झालेले होते.

त्यांनी श्रीमहाराजांना अधिष्ठान ठेवून जे कार्य केले त्याची टिपणे आत्मवृत्त या नावाखाली टिपून ठेवली होती.
या पुस्तकाचे प्रकाशन २००२ मध्ये श्रीक्षेत्र हेबळ्ळी येथे श्रीदत्तात्रेय अवधूत यांनी प्रसिध्द केले.