श्रीब्रह्मानंदस्वामी

श्रीब्रह्मानंदस्वामी -
---------------------

-----------------------
[चरित्र - श्री. के. वि. बेलसरे, श्री. भास्कर लिमये]
मूळ नाव - श्री अनंत गाडगुळी
मूळ गाव - विजापूरातील जालिहाल
जन्म - शके १७८० (सन १८५९)
------------------
घराण्याची पूर्वपीठिका
आश्वलायन शाखाध्यायी, भारद्वाज गोत्री, स्मार्त ब्राह्मण
घराण्यात अनेक विद्वान ब्राह्मण होऊन गेले.
आजोबा - अतिशय आचारसंपन्न, सात्विक, वेदशास्त्रसंपन्न, सत्य-दया-दान-परोपकार यांनी मंडित, सर्व ब्रह्मवृंदात अतिशय पूज्य व आदर्शभूत, ज्योतिषशास्त्रात पारंगत, धर्मशास्त्रात निपुण, शांत व निरभिमानी होते. भगवंतावर त्यांची कमालीची श्रध्दा होती.
वडीलही आजोबांप्रमाणेच होते.वडिलांना जलाशयावर स्नान करताना एका भोपळ्यात एक अनंताचा दोरा मिळाला होता. अनंताचे व्रत त्यांनी सुरु केले.
आई - सुशील, पतिभक्तिपरायण, साध्वी, अतिथीधर्मपालनात तत्पर होती.
दोघांना साधुसंतांचे आशीर्वाद मिळत.
------------------
स्वामींच्या वेळचे आईचे गर्भारपण व स्वामींचा जन्म -
अंगकांति दिव्य तेजाने तळपत होती.
भगवत्‌चिंतन सोडून इतर काही नकोसे झाले.
भगवंताच्या लीला ऐकताना वरचेवर समाधि लागू लागली
स्वामींचा जन्म झल्यावर विधीपूर्वक जातकर्म संस्कार झाला. विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा दिली
बाराव्या वर्षी स्वस्तिवाचनपूर्वक विधीयुक्त नामकरण विधी केला.
--------------------------
बाळपण -

॥श्रीराम समर्थ॥