महाराजांची गुरुपरंपरा

महाराजांची गुरुपरंपरा-

श्रीआदिनारायण - प्रलयानंतर वटपत्रावर पहुडलेले व आरामात पाण्यात तरंगत असलेले परब्रह्म
श्रीब्रह्मदेव - आदिनारायणच्या इच्छेखातर सृष्टीची निर्मिती करणारे मायेचे रजोगुणी तत्व
श्रीवसिष्ठ ऋषी - सप्तर्षींपैकी एक जे त्रेतायुगात रघुवंशात पौरोहित्य करीत होते. श्रीरामावतारामध्ये श्रीरामप्रभूंचे दर्शन करावे व त्यांचे पौरोहित्य करावे यासाठी ज्यांनी जन्म घेतला.
श्रीरामप्रभू - श्रीविष्णूंचे अंशावतार. रावणादि असूरांचा संहार करण्याचे पृथ्वी व देवांना दिलेले वचन पाळण्यासाठी कौसल्येपोटी घेतलेला मानवी अवतार. संमोहाच्या वेळी गुरु श्रीवसिष्ठ व श्रीविश्वामित्र यांना सामान्य माणसाप्रमाणे प्रश्न विचारून, त्यांच्या उत्तरांनी निःशंक होऊन नंतर राममंत्राची उपासना करून समाधिअवस्था श्रीवशिष्ठांकडून प्राप्त करुन घेतली. (संदर्भग्रंथ - श्रीयोगवासिष्ठ)
श्रीरामदास -

५०० वर्षांपूर्वी झालेला श्रीहनुमानाचा अंशावतार. १२ वर्षे नाशिकजवळ टाकळीला केलेली कठोर तपस्या. श्रीरामरायानं स्वामींना प्रत्यक्ष दिलेला अनुग्रह. श्रीरामरायाच्या व श्रीमारुतिरायाच्या आदेशानुसार तीर्थाटनानंतर कृष्णाकाठ हे कार्यक्षेत्र ठरवले. त्यांनी श्रीशिवाजीराजांच्या स्वराज्यनिर्मितीला आध्यात्मिक अधिष्ठान दिले. मोठा शिष्यपरिवार करून त्यांना रामदासी दीक्षा दिली. अनेक मारूतिमंदिरे स्थापन करून बलोपासना, लोकजागरण सुरु केले.
श्रीकल्याण - श्रीरामदासांचे सत्शिष्य
श्रीबालकृष्ण -
श्रीचिंतामणी -श्रीरामकृष्णांवर या श्रीरामरायाच्या महाभक्ताचा अनुग्रह झाला.
श्रीरामकृष्ण - श्रीसमर्थसंप्रदायातील थोर महाज्ञानी. मूळ मोगलाईत रहाणारे, बालपणापासून भगवत्‌भजनाची आवड असणारे. त्यांनीच महाराजांना श्रीतुकामाईंकडे पाठवले.
श्रीतुकाराम (तुकामाई) - महाराजांचे सद्गुरु

॥श्रीराम समर्थ॥