सत्कर्माचे आचरण

सत्कर्माचे आचरण -
-------------------------
भक्तिमार्गाला लागण्यामध्येच सत्कर्मांचे बीज आहे.
परमात्मा हा कर्ता आहे ही भावना प्रबळ होऊ लागली व शरणागतीची तीव्रता व वारंवारता वाढायला लागली की सत्कर्मे हातून आपोआप घडत जातात.
----------------------
अशी कर्मे करणारे साधक मला भेटत गेले.
सुरुवातीला मी प्रयोग म्हणून करीत गेले, मूल ग्रंथांतून शोध घेतला, स्वधर्मपालनाविषयी जाणून घेत गेले.
आमच्या कुलोपाध्यायांचे सहकार्य मला अतिशय झाले.
अशा कर्मांचे सोईनुसार वर्गीकरण केले आहे
१) नित्य कर्मे - रोज करण्याची सत्कर्मे (परमेश्वराशी जवळीक साधणारी कर्मे)
- रोजची सगुण पूजा
- रोजची साधना
२) नैमित्तिक कर्मे - विशेष प्रसंगाच्या निमित्ताने होणारी सत्कर्मे
- उत्सव
- तीर्थयात्रा
- कुळधर्म-कुळाचार
- श्राध्दपक्ष
- सोयर-सुतक-शांति इ.

॥श्रीराम समर्थ॥