मायेचे साम्राज्य

मायेचे साम्राज्य - ३० ते ३९
--------------------------------
- मायेच्या प्रभावामुळे हे दृश्य जग भासते
- तिच्यामुळेच दृश्य जगाचा निरास होतो
- जे सतत बदलते त्यामधून जीवाला बाहेर काढून आत्मपदी स्थिर करण्याचे शक्तीचे काम माया करते
- मायेमुळे अद्वैत कायम ठेवून भक्त ईश्वरी प्रेमाचा आनंद लुटतो
- मायेच्या सत्तेने विविधांगी विद्‌वत्ता प्रकटते
- मूर्ख माणसाला अंतरंगामध्ये बदल घडवून त्याला आत्म-अनात्म विवेकी बनविण्याचा चमत्कार माया करते
- अखंड आत्मस्मृति टिकविण्यासाठी लागणारी मोठी दक्षता आणि एकाग्रता साधण्यासाठी लागणारी प्रचंड शक्ति माया पुरवते व साधकाचे स्वरूपानुसंधान टिकवून धरते
- माया साधकाचे जगाविषयीचे भ्रम नाहीसे करून प्रपंचाचे अनुसंधान मोडण्यास मदत करते
- बाहेर धावणार्‍या वृत्तींना आत वळवून स्वरूपामध्ये स्थिर करण्यासाठी लागणारे आत्मबल माया पुरविते
- ईश्वराभिमुख होऊन त्याच्या दर्शनासाठी जी वाटचाल करावी लागते, त्या मागच्या निश्चयाला माया बल पुरवते
- माया मातेसारखी प्रेमळ आहे
- साधक आत्मस्वरूपी रमला की माया अंतर्धान पावते
हे साधका, मायेचा स्वभाव सतत बदलणे असा आहे. म्हणून स्वस्वरूपात स्थिर होण्यासाठी तिची मदत घ्यावी पण अखेर तिला सोडावी

॥श्रीराम समर्थ॥