स्वामींचे उत्तर

स्वामींचे उत्तर - २७ ते २९
-------------------------
प्रत्येक माणुस प्रत्यक्ष जगावर आधारलेले स्वतःचे एक खाजगी व मानसिक प्रतिमामय जग तयार करतो.
ते जग खरे नसते
त्या जगाचा त्याग करणे अवश्य आहे
या मनःकल्पित जगाच्या त्यागालाच संत दृश्यविलय म्हणतात

स्वामी म्हणतात -
स्वतः अनुभव घ्यावा आणि असत्याचा त्याग करावा
मनाला भासणारे सर्व काही मायानिर्मित आहे. ते खोटे आहे.
परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी माया मुळी रहातच नाही.
माया आहे व माया नाही ही भाषा सुध्दा मायेचाच एक प्रकार आहे.
माया स्वरूपानुभवाच्या आड येते, तिला बाजूला सारली पाहिजे याची तीव्र जाणीव झाली की तिच्यातून पार पडण्याचा मार्ग माणूस शोधू लागतो.
असा विवेक करणं हेच मनन होय
याच्या पुढचं मार्गदर्शन सावध चित्ताने ऐक असं स्वामी सांगतात.

॥श्रीराम समर्थ॥