स्वामींचे उत्तर

स्वामींचे उत्तर - २३ ते २५
-------------------
जे खरे आहे त्यावर जे खोटे आहे त्याचे चोहोबाजूंनी रान माजले.
तसेच जे खोटे आहे ते आपल्या सीमेत राहिले आणि जन्मांध असा जो तू त्याने ते पाहिले.
ही सगळीच मोठी विलक्षण गोष्ट आहे.
परमात्मा फक्त असतो (सत्‌)
माया नसते (असत्‌)
जे नाहीच आहे ते मर्यादेमध्ये राहिले असे म्हणणे यार काहीच अर्थ नाही.
जन्मांध माणसाने "मी पाहिले" असं म्हणण्याला काही अर्थ नसतो.
-----------------
असंभाव्य ३ गोष्टी -
१) सत्‌ला असत्याने झाकले
२) असत्‌ मर्यादा सांभाळून राहिले
३) जन्मांध माणसाने पाहिले
------------------------
- अध्यात्मामध्ये स्वस्वरूप किंवा ईश्वरस्वरूप पाहण्यास लागणारी अतिशय सूक्ष्म दृष्टी संतांच्याकडून शिकावी लागते.
- ती सूक्ष्म दृष्टी ज्याला प्राप्त नसते तो अध्यात्मदृष्ट्या जन्मांधच समजावा
- परमात्मा व त्याची माया यांचा संबंध त्याला आकलन होऊच शकत नाही
- म्हणून त्याच्या बोलण्याला संत किंमत देत नाहीत
---------------------------------
स्वामी - परमात्मा आणि माया यांचा संबंध समजल्याची कल्पना करून तू हे बोलतोस, याचा तुला संकोच कसा वाटत नाही?

गुरु कसा आहे? -
ब्रह्मज्ञानी
गुरुचा दृष्टीकोन ब्रह्मसाक्षात्कारावर अधिष्ठित
गुरुचे ज्ञान परिपूर्ण
गुरु अजातवादी (एकच परमात्मा, जग झालेच नाही, परमात्मस्वरूप स्वतःच्या ठिकाणी सत्‌रूपाने स्फुरते, परमात्मस्वरूपा साक्षात्कार होऊन खर्‍या ज्ञानाचा उदय झाला की हा जगत्‌रूपी आभास नाहीसा होतो

शिष्य कसा आहे?
अज्ञानी आहे
त्याचा दृष्टीकोन विश्वाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेला आहे
त्याचे ज्ञान सदोष, अपुरे व असत्य आहे
शिष्याचे जगाचे ज्ञान संबंधमय आहे
जे झाले आहे असे त्याला भासते ते परमात्म्याच्या माया नावाच्या एका विलक्षन शक्तीमुळे असे त्याला वाटते.

॥श्रीराम समर्थ॥