मायेचा प्रचंड विस्तार

मायेचा प्रचंड विस्तार - ओव्या १० ते २०

ओवी १० -
 • सर्व नाशिवंत हे मायानिर्मित असते.
 • या मायेच्या विस्ताराविषयी सांगतो, ते ऐक.

ओवी ११ -

ओवी १२ -

 • मूळ एकच एक असणारा परमात्मा, त्याच्याच शक्तीने व त्याच्याच संमतीने अनेकपणाने विश्वामध्ये विलसतो.
 • परमात्म्याच्या अनेक शक्तींपैकी एक व्यक्त-अव्यक्तचा खेळ खेळते.
 • परमात्म्याच्या सर्व शक्ती त्याच्या ठिकाणी तादात्म्याने स्वस्थ असतात. त्या गतीमान होण्यास त्यांना अधिष्ठान आवश्यक असते.
 • ‘अहं’ हे स्फुरण झाले की परमात्मा शक्तीने स्फुरु लागतो. त्याला न सोडता त्याच्याच अधिष्ठानावर माया आपली करामत दाखवू लागते.
 • मूळ माया ही अव्यक्तपणाची परमसीमा होय.

ओवी १३ -

 • मुळात माया एकच आहे पण दोन ठिकाणी विभागून ती पुरुष व प्रकृती होते.
 • पुरुष म्हणजे चेतन रूप.
 • प्रकृती म्हणजे अचेतन (जड) रूप.
 • चेतनेला व्यक्त होण्यासाठी लागणारे माध्यम म्हणजे अचेतन.

ओवी १४ -

 • पुरुष हा प्रकृतीचा केवळ द्रष्टा आहे.
 • अविवेक - प्रकृतीच्या नादी पुरुष लागतो, गुंतून पडतो.
 • ध्यानयोगात - समाधीअवस्थेत पुरुषाला आपले मूळचे शुद्ध द्रष्टेपण प्राप्त होते.

ओवी १५ -

  ईश्वराचे वर्णन करणारी सर्व विशेषणे मायेच्या कक्षेत येतात.

ओवी १६ -

  परमेश्वराचा विचार सामान्य माणूस करतो तेव्हा,
  १) रूप - इंद्रियगोचर आकार,
  २) अरूप - अनेक आकारांत व्यापून राहिलेले सूक्ष्म तत्त्व, आकारशून्य - नाम,
  ३) स्वरूप - आत्म्याची स्वाभाविक स्थिती,
  ४) आत्मा - शुद्ध चैतन्य, सर्वव्यापी,
  ५) ब्रह्म - अद्वय परमात्मा, असीम, अनंत.
  हे सर्व भेदाने वेगळे पाहाणे मायेच्या प्रांतात येते.

ओवी १७ -

 • जीव, शिव, ईश्वर, विश्वरूप, विश्वंभर हे देखील मायेमध्येच येतात.
 • माया म्हणजे ईश्वराशी अभिन्न असलेली त्याची सृजनशील शक्ती.

ओवी १८ -

 • माया मनाला गती देते.
 • माया बुद्धीला आच्छादते.
 • माया, एकाच सद्‌वस्तूमध्ये अनेकपण दाखवते.

ओवी १९ -

 • मायेच्या शक्तीने देह चालतो.
 • मायेच्या शक्तीने वाणी शब्द उच्चारते.
 • मायाच डोळ्यांत शिरून दृश्य पदार्थ दाखवते.
 • जी मायाशक्ती विश्व निर्माण करून त्याचा व्यवहार चालवते, तीच निरनिराळ्या रूपांनी मानवी जीवनामध्ये कार्य करते.

ओवी २० -
माया -

 • कार्य करते,
 • कार्य करवून घेते,
 • बोलते,
 • बोलण्याची शक्ती देते,
 • चलनवलन करते,
 • चलनवलन करण्याची शक्ती देते.
 • (प्राण) शक्तीच्या रूपाने हे सारे माया घडवून आणते.

॥श्रीराम समर्थ॥