शिष्याची विनंती

शिष्याची विनंती - १ ते ४
------------------------
ओवी १
सद्‌गुरु कसा असतो?
वासनाशून्य
धगधगीत वैराग्यशाली
अविचल आत्मनिश्चयाचे समाधान असलेला
अत्यंत कृपाळू
सर्वज्ञ
सर्वशक्तीसंपन्न

सद्‌गुरु शिष्यासाठी काय करतो?
शिष्याला तो आपण होऊन हाताशी धरतो.
शिष्याकडून क्रमाक्रमाने साधना करवून घेऊन, त्याला स्वरूपानुसंधानाची दिव्य कला शिकवतो.
शिष्याचे अनुसंधान पक्के झाले की सद्‌गुरु शिष्याला अनुभूतीच्या दृष्टीने स्वत:च्या पातळीवर आणतो.
ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत गुरुशिष्यांमध्ये भेद उरत नाही.

सत्‌शिष्याचे प्रधान लक्षण
सद्‌गुरुच्या अगाध कृपाळूपणाची पूर्ण जाणीव होणे.
मनुष्यरूपीने साकार झालेला ज्ञानसागर ईश्वरच आहे, हे लक्षात येणे.

श्रीसमर्थांनी सांगितलेली सद्‌गुरुची लक्षणे
सत्‌ + चित्‌ +आनंद
आनंदकंद
निजबोध
परमपुरुष
सद्‌गुरुर आत्मबुद्दीमध्ये ईश्वरपणाने अथवा शिवपणे राहातो.
जीवाला जे (जगाचे) अनुभव येतात त्याच्या उलट अनुभव सद्‌गुरुचे असतात.

सद्‌गुरु -
चालता-बोलता ईश्वर
दिव्यपुरुष
माणूसपणाची मर्यादा नाही
माणसाचे कर्म + ईश्वराचे ज्ञान यांचा मधुर संगम जीवनात पदोपदी दिसतो.

॥श्रीराम समर्थ॥