शिष्याची त्यागास संमति

शिष्याची त्यागास संमति (ओव्या ३६ ते ३९)

स्वामी निजपद प्राप्त झाले असे म्हणतात आणि सूचना करतात की यापुढे जगातील सर्व वस्तूंबद्दलचे ममत्त्व सोड (नवीन निर्माण करू नकोस)
atmaram image.jpg
ओवी ३७

शिष्य जर बहिर्मुख असेल तर सद्गुरुचा सहवास त्याला हवासा वाटतो.
शिष्य संपूर्ण आत्मसंमुख झाला की त्याला हृदयस्थ ईश्वरकडून (आतल्या आवाजाकडून) निश्चित व स्पष्ट मार्गदर्शन सुरू होते.
--------------------------------------------------
नाशवंताचे समर्पण - प्रमुख मुद्दे

मायेने भुलविल्यामुळे शिष्याचे अढळपद गेले.
ते परत मिळविण्यासाठी त्याचे स्वत:ची शक्ती अपुरी पडली.
सद्गुरुंचे साहाय्य झाले.
शिष्याकडून अनित्य वस्तूंविषयीचा संपूर्ण त्याग आणि सद्गुरुंविषयी संपूर्ण श्रद्धा, या दोन गोष्टींची अपेक्षा, आवश्यकता.
बाह्य वस्तूंविषयी आसक्ती असेल तर अंत:करण मलीन असते, म्हणून आत्मसाक्षात्कार घडत नाही.
सर्व अनित्य वस्तूंविषयी वाटणारे ममत्त्व सद्गुरुंना अर्पण केले की ते निजपद मिळवून देतात.
----------------------------
ओवी ३८

सद्गुरु ’"मी जातो" म्हणतात.
शिष्य त्यांना प्रेमाने थांबवून घेतो.
त्यांचा संवाद घडतो. (पुढील समासात)
तो संवाद परमानंद देणारा आहे.
आत्मारामाचा पहिला समास पूर्ण झाला यानंतर स्वामी पुढचे रहस्य सांगतील
हे अनुभवाचे वर्म सावध होऊन ऐकावे असे ते वाचकाला / श्रोत्याला सांगत आहेत.
सद्गुरुंचे ऐकून शिष्याने अनित्य वस्तूमधली आसक्ती / ममत्त्व सोडले -अर्पण केले.
सद्गुरु म्हणतात, “मागची आसक्ती सोडलीस, यापुढेही ती बाळगू नकोस.”
“तुला आता निजपद मिळेल’, असे सांगून सद्गुरु शिष्याला सोडून जाऊ लागतात.
शिष्याची सद्गुरुंमध्ये मनाने गुंतवणूक झाल्यामुळे तो त्यांना ‘थांबा’ असे प्रेमाने विनवतो आहे.
सद्गुरु व त्यांचा शिष्य यांच्यामध्ये अतिशय गूढ असा संवाद घडतो, त्याचे वर्णन पुढील समासात आहे. ते ऐकूनच श्रोत्यांना अतिशय आनंद होणार आहे. हा संवाद सावध चित्ताने ऐकावा.

॥श्रीराम समर्थ॥