संत श्रोत्यांना वंदन

संत श्रोत्यांना वंदन (ओव्या १६, १७)

अध्यात्मावर ग्रंथ लिहिणार्‍या व्यक्तींची आध्यात्मिक योग्यता काय आहे हे पाहाण्याचे काम संत (आत्मसाक्षात्कारी पुरुष) करतात.
ज्या ग्रंथांमध्ये स्वस्वरूपानुभव प्रकटपणे दिसतो, त्या ग्रंथालाच संत मानतात.
ग्रंथाची भाषा कोणतीही असू शकते.
श्रीरामदास स्वत: संत, तेही संतांना वंदन करतात.
संतांचे वर्णन करणे सोपे नाही.
ते आत्मस्वरूपाहूनही थोर (बाप) आहेत.
ज्या आत्मस्वरूपाचे वर्णन करणे वेदांना शक्य झाले नाही, ते अतींद्रिय आत्मस्वरूप, दृश्य जगात संतांच्या जीवनातून प्रत्ययाला येते.
-----------------------------------------
संतश्रोत्यांना - महत्त्वाचे मुद्दे

संत आत्मस्वरूपाहूनही थोर असतात.
आत्मस्वरूप संतांच्या जगण्यातून गोचर होते.
हे संत कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथांची योग्यता, ते लिहिणार्‍या व्यक्तीचा अधिकार पारखण्याचे काम करतात.

॥श्रीराम समर्थ॥