श्राध्दपक्ष

श्राध्दपक्ष

श्राद्ध हा शब्द मूळ ‘श्रत:’ या अव्ययाने तयार झाला.
श्रद्धया क्रियते तत: श्राद्धम्‌ । -
श्रद्धेने, पितरांना उद्देशून विधीवत्‌ हविष्यर्युक्त पिंडप्रदान इत्यादी कर्मे करणे याला श्राद्ध म्हणतात.

सत्यम्‌ ददाति श्रद्धा । - याला वेदांतप्रमाण आहे (कात्यायन स्मृती)
----------------------------------
पितरांना उद्देशून केलेल्या श्राद्धाला पितृयज्ञ म्हणतात.
पितर – पितृ (पा) - रक्षणे. पितर आपल्या कुलाचे रक्षण करतात.
पितृलोक – चंद्रलोकाच्या वर पितृलोक आहे. (प्रद्यौत)
-------------------
प्रारब्धाद्वारा जे पितरांना संतुष्ट करतात त्यांना पितरांचे आशीर्वाद मिळतात. पितर आपल्या पुत्रादिकांना, आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, पशू, स्त्री व आरोग्य देतात.
-------------------------
कलियुगात पितरांचे श्राद्ध करण्याचे महत्त्व कमी होत गेलेले आपल्याला दिसते. श्राद्धकर्म झाले नाही तर पितरांना प्रेतत्त्व येते. श्राद्ध न केल्यास आपले पितर आपल्याला दारूण शाप देऊन पितृलोकात किंवा प्रेतलोकात निघून जातात.

॥श्रीराम समर्थ॥