श्रीगुरुचरित्रभाष्यसार

श्रीगुरुचरित्रभाष्यसार
[संदर्भ - श्रीगुरुचरित्र अन्वयार्थ अथवा सुबोध गुरुचरित्र]
भाष्यकार - श्री. उमाकांत कुर्लेकर
मूळ ग्रंथकार - श्रीनृसिंहसरस्वतींचे एक प्रमुख शिष्य श्रीसायंदेव यांच्या पांचव्या पिढीतील वंशज सरस्वती गंगाधर (नामधारक)
-------------------------------------------------------
मूळ ग्रंथात एकूण ५१ अध्याय + १ अवतरणिका
मूळ ग्रंथाचे वैशिष्ठ्य -
- या ग्रंथाचा मुख्य विषय सद्गुरु, गुरुभक्ति, गुरुकृपा असा आहे.
- हा मराठी भाषेतील धार्मिक ग्रंथांपैकी एक मान्यवर ग्रंथ आहे.
- दत्तसंप्रदायात या ग्रंथाला वेदतुल्य महत्व आहे.
- गुरुचरित्र हा गुरुतत्वांचा हार किंवा तत्वमाला आहे.
- या ग्रंथाचे मूळ लक्ष्य गुरुकृपेची इच्छा करणारी सामान्य व्यक्ति हेच आहे.
- यात पौराणिक कथांचा उपयोग ग्रंथकाराला अभिप्रेत असलेल्या मुद्द्याचे प्रतिपादन करण्यासाठी केला आहे.
- हा प्रासादिक ग्रंथ ग्रंथकाराने स्वतःच्या कल्पनेने लिहिलेला नसून तो श्रीगुरुदेवांच्या आज्ञेने लिहिलेला आहे.
- हा ग्रंथ मंत्रमय आहे. त्यामुळे त्याच्या पारायणासाठी सोवळ्याचे व शुचिर्भूतपणाचे नियम कडकपणे पाळण्याची परंपरा आजही पाळली जाते.
-----------------------------------------------------------------
- त्यामुळेच मी भाष्य वाचले. मूळ ग्रंथ वाचला नाही.
----------------------------
१) ज्ञानकांड - अध्याय १ ते २४ (१ ते १० धर्मपुरुषार्थ, ११ ते २४ अर्थपुरुषार्थ)
२) कर्मकांड - अध्याय २५ ते ३७ (२५ ते ३५ कामपुरुषार्थ, ३६, ३७ आचारधर्म)
३) भक्तिकांड - अध्याय ३८ ते ५१ (मोक्षपुरुषार्थ)
--------------------------------------
मंगलाचरण - अध्याय - १
विश्वोत्पत्ति व कलि-ब्रह्मदेव संवाद - अध्याय २
श्रीपाद-श्रीवल्लभ चरित्र - अध्याय ५ ते १०
श्रीनृसिंहसरस्वती चरित्र - अध्याय ११ ते ५१
-------------------------------------------------
मृत्यूचे व मृतसंजीवनाचे अध्याय - १०, २०, २१, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ४०.

॥श्रीराम समर्थ॥