कुळधर्म-कुळाचार

कुळधर्म-कुळाचार

कुल -
हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ वंश-घराणे असा आहे. कुल म्हणजे एकत्र येणे-गोळा करणे.
महाकुले - प्रतिष्ठित व यशस्वी कुले

धर्म - कर्तव्य करणे - ते पार पाडणे.
आपापल्या घराण्यातील कुलाचार म्हणजेच कुलपरंपरेने चालत आलेले धर्मविधी किंवा धार्मिक चालीरीती त्यातील माणसांनी पार पाडणे म्हणजे कुलधर्माचे पालन करणे.
--------------------------------------
कुलदैवत, कुलस्वामिनी -
प्रत्येक घराण्याचे कुलदैवत व कुलस्वामिनी असते.
यांची उपासना त्या त्या घराण्यातील लोक परंपरेने करतात. प्रत्येक शुभमंगल प्रसंगी कुलदेवतेचे पूजन करतात आणि ठराविक दिवशी त्या कुलदैवताला महानैवेद्य समर्पण करण्याची प्रथा असते. त्याला कुळधर्म म्हणतात.
हे कुळधर्म बहुतांशी सणांशी वा उत्सवांशी निगडित असतात.

॥श्रीराम समर्थ॥