रामाचा शबरीला उपदेश

रामाचा शबरीला उपदेश
माझ्या भक्तीसाठी भक्ती हेच एकमेव साधन आहे.
खालील गोष्टींवर माझी भक्ती अवलंबून नाही -
पुरुष / स्त्री
जातीविशेष
नामविशेष
आश्रमविशेष
माझ्याशी पराङ्‌मुख होऊन केलेला यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन, इतर अनेक कर्मे यांनी माझी भक्ती मिळत नाही.
माझ्या भक्तीची साधने संक्षेपाने सांगतो (नवविधा भक्ती) -
सज्जनांची संगती
माझ्या कथांचे वर्णन
माझ्या गुणांचे गायन
माझ्या वचनांवर व्याख्यान
आपल्या गुरुला राम समजून निष्कपट बुद्धीने त्याची उपासना करणे.
पुण्यशील होणे (पुण्याचरण ठेवणे) - यमनियमांचे पालन करणे, माझी पूजा नित्य निष्ठा ठेऊन करणे.
माझ्या मंत्राची सांग उपासना करणे.
माझ्या भक्तांची पूजा करणे, सर्व भूतांच्या ठायी मला पाहाणे, लौकिक गोष्टींविषयी वैराग्य असणे, इंद्रियांचा निग्रह करणे.
माझ्या स्वरूपाचा विचार करणे.
माझी भक्ती मिळाली की -
प्रेम हे मुख्य लक्षण दिसू लागते.
माझ्या स्वरूपाचा अनुभव येऊ लागतो.
याच जन्मात मुक्ती मिळते.
म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ती.
(ग्रंथकर्त्याचा उपदेश – बाकी इतर तांत्रिक प्रयोग टाकून द्या आणि उत्कटतेने श्रीरामचरणांची सेवा करा.)